ब्रेकिंग : अखेर युवकाच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक,,गुन्हा दाखल #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : अखेर युवकाच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक,,गुन्हा दाखल #murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -11 एप्रिल -
तालुक्यातील नारपठार (विजयगुडा) येथील सोमराज ईशरु सीडाम (२१)या युवकाच्या हत्येप्रकरणी काल सायंकाळी जिवती पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
पोलिस स्टेशन जिवती येथून माहिती घेतली असता नारपठार येथील मृतक सोमराज सीडाम व इतर तीन इसम आरोपीच्या शेतात सागाचे तोडलेले लाकडे आणण्यासाठी गेले असता आरोपी संबाजी गायमुखे,अविनाश गायमुखे, माधव गायमुखे,साधव मोरे,हरिभाऊ डुकरे व विकास डुकरे सर्व केकेझरी यांनी कट रचून मृतक सोमराज सीडाम याला लाथाबुक्यांनी व दगडाने मारले असता त्याला मुक्का मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

सोबत असलेल्या साक्षीदार यांच्या अंगावर पाठलाग करून दगड फेक केली अशी तक्रार फिर्यादी लिंबाराव धुंदी कुमरे यांनी पोलीस स्टेशन जिवती येथे केली या तक्रारीवरून संभाजी गायमुखे, अविनाश गायमुखे, माधव गायमुखे, साधव मोरे,हरिभाऊ डुकरे व विकास डुकरे यांच्यावर भांदवी कलम 302,323,336,120(ब),143,147,149 अन्व्हये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास ठाणेदार विश्वास पुल्लरवार हे करीत आहेत.

-------------------------------------------

चंद्रपूर ब्रेकिंग : युवकाची जंगलात हत्या - लाकडे आणण्यासाठी गेला होता ! #murder  

खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती - संतोष इंद्राळे-10 एप्रिल 

जिवती तालुक्यातील नारपठार(विजयगुडा)येथिल चार युवक गुरूवारी जंगलात लाकडे आणण्यासाठी गेली होती.त्यापैकी एकाची हत्या झाल्याने सकाळी  सर्वत्र खळबळ उडाली.सोमराज इशरू सिडाम(21)असे मृत्यकाचे नाव आहे.
                
प्राप्त माहितीनुसार मृत्यक सोमराज व गावातील शंकर आञाम,लिंबाराव कुमरे,व राजु कुमरे हे चार युवक गुरूवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान गावापासून अंदाजे चार कि.मि.अंतरावर असलेल्या जंगलात लाकडे आणण्यासाठी बैलबंडी घेऊन गेले होते.जंगलात पोहोचताच चडावर बैलबंडी सोडून लाकडे जमा करण्यासाठी शेताकडे निघाले.

अचानक समोरून त्यांच्यावर काही जणांनी  सोमराजवर हमला केल्याने सहकारी तिघे जंगलातून गावच्या दिशेने पळाले व घडलेली हकिकत गावकाऱ्यांना सांगितले.तेव्हा गावातील काही जण जंगलाकडे धाव घेतली जंगलात शोधाशोध केली माञ सोमराज कुठेच मिळाला नाही.हे चार युवकांनी ज्याच्या शेतात लाकडे तोडली त्या शेतमालकाच्या घरी जाऊन त्यास विचारपुस केली.

असता शेतातील राखलेली सागाची झाडे तोडल्याने मि बैलबंडी घेऊन आलो झाडे तोडणाऱ्यास आणा आणि बैलबंडी घेऊन जा असे म्हणल्याने ते वापस निघाले.वापस येताना गावालगत असलेल्या शेतात सोमराज गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे उजेडात दिसताच गावकरी त्या दिशेने पळाले.त्याची विचारपुस केली तेव्हा त्याने मारहाण झाल्याचे सांगितले व जिव सोडल्याची घटना पहाटे 4 वाजता उघडकीस आल्याचे त्याचे नातेवाईक सांगत आहे.


या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार उपविभागीय पोलिस आधिकारी विलास यामावार व जिवती ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी पोलिस कर्मचारी घेऊन घटनास्थळ गाठून पंचनामा केला.आणि मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचांदुरला पाठविले असुन बातमी पाठवेपर्यंत अज्ञात मारेकऱ्याविरूद्ध जिवती पोलिसात   गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

पुढिल तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार करित आहे.