चंद्रपूर बिग ब्रेकिंग : बल्लारपुरात दोन मुलांवर बंदुकीची गोळी झाडून वडिलांची हत्या / आत्महत्या? #murder or suicide? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर बिग ब्रेकिंग : बल्लारपुरात दोन मुलांवर बंदुकीची गोळी झाडून वडिलांची हत्या / आत्महत्या? #murder or suicide?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -



बल्लारपूर शहरातील वेकोलि वसाहत परिसर, जोकू नाला येथे राहत्या घरी माजी भाजप शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी यांचे बंधू मुलचंद द्विवेदी (शिवचंद द्विवेदी जी यांचे बंडू ) वय -47, यांनी आपली दोन मुले  पवन मुलचंद द्विवेदी वय -21, व दुसरा मुलगा अंदाजे आकाश मुलचंद द्विवेदी वय 25 यांची स्वतः च्या बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 

वृत्त लिहेपर्यंत या घटनेत  मुलचंद द्विवेदी व मुलगा आकाश  यांचा मृत्यू झाला पवन याला  उपचारार्थ चंद्रपूर येथून आता नागपूर ला नेत आल्याचे कळले.  प्रकरणात नेमके कोणी कोणास बंदुकीने गोळी मारली हे निश्चित माहिती नाही. प्रकरण हाय प्रोफाइल असल्याने कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.