संशयित रुग्ण निगेटिव्ह - प्रशासनाची तयारी पॉसिटीव्ह : सिंदेवाही तालुल्यात तालुका प्रशासनाची मॉक ड्रिल : कोरोना रुग्ण आढळ्यास प्रशासन पूर्वतयारीत #mockdrillcorona - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संशयित रुग्ण निगेटिव्ह - प्रशासनाची तयारी पॉसिटीव्ह : सिंदेवाही तालुल्यात तालुका प्रशासनाची मॉक ड्रिल : कोरोना रुग्ण आढळ्यास प्रशासन पूर्वतयारीत #mockdrillcorona

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(सिंदेवाही -अमृत दंडवते )

आज दिनांक 10 एप्रिल,  सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी मेंढा व चिकमारा येथे जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या आदेशाप्रमाणे कोरोना रुग्ण आढल्यानंतर करावयाची कार्यवाहीचा  mock drill -  प्रात्याक्षिक घेण्यात आला.यामध्ये containment प्लॅन प्रमाणे आजूबाजूचा 3 किलोमीटर परिसर सील करून आरोग्य सेविका,आशा व अंगणवाडी सेविका मार्फत करावयाच्या सर्वेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

या प्रात्याक्षिकास सिंदेवाही तहसीलदार श्री. गणेश जगदाले, ससंवर्ग विकास अधिकारी श्री. इल्लूरकर,ठाणेदार श्री. निशिकांत रामटेके थानेदार सिंदेवाही  डॉ. मानकर,  डॉ. दोडके श्री. घाटोळे, विस्तार अधिकारी. श्री.नागोसे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.