मोबाइल च्या अतिवापराने अनेक युवकांच्या झोपेवर दुष्परिणाम(लेखक:विद्यार्थीमित्र नितीन सेलकर (संस्थापक,अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना)#mobile - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोबाइल च्या अतिवापराने अनेक युवकांच्या झोपेवर दुष्परिणाम(लेखक:विद्यार्थीमित्र नितीन सेलकर (संस्थापक,अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना)#mobile

Share This
खबरकट्टा / शैक्षणिक : 

मागील दहा वर्षातील देशातील परिस्तिथी बघितली असता जुन्या काळात मोबाईल नव्हताच, मागील दहा वर्षाच्या काळात बटन मोबाईल म्हणून ग्रामीण भागात पोहचला त्यानंतर हळूहळू चायना मधून टच मोबाईल पसरायला सुरुवात झाली आणि आता मात्र सध्याच्या काळात इयत्ता पाचवी वरील सर्व विद्यार्थी व युवकांकडे वयक्तिक मोबाईल आहेत.सरासरी संपूर्ण घराचा विचार केल्यास परिवारातील संपूर्ण सदस्य यांचेकडे स्मार्ट फोन आलेले आहेत त्यामुळे वेळ काढण्यासाठी म्हणून अनेक युवकांना मोबाइल चे एक वेगळे वेढ लागलेले असून मोबाईल ही माणसाच्या आयुष्यातील अन्न, वस्त्र, निवारा अशीच चौथी प्रमुख गरज बनली आहे.
                
अनेक युवक मोबाईल चा अतिवापर करत असल्याने व सोशल मीडियावर आपला अधिकाधिक वेळ घालण्यात व्यस्त असल्याने याचा परिणाम त्यांच्या झोपेवर आणि झोपेतून त्यांच्या आरोग्यावर पडत आहे.मानवी शरीराला एक मर्यादित झोप हवी असते त्यामुळे संपूर्ण शरीरासह आरोग्य सुद्धा सुदृढ राहण्यास मदत होते मात्र अनेक युवकांना या मोबाईल अतिवापराने झोप न लागण्याचे दिसून येते आहे.
             
वेळीच पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत सावधपणा घेतला नाहीतर भविष्यात त्यांच्या मुलांच्या आरोग्याला धोका होण्याच्या अनेकानेक संभावना आहे.झोप बरोबर होत नसल्याने अनेक युवकांना विविध प्रकारचे रोग होण्याची दाट शक्यता आहे.तर मोबाईल च्या अतिवापराने सुद्धा हृदय विकारक बिमारी होण्याचे संकेत आहे.
          
म्हणून स्वतः युवकाने या गोष्टीचे तारतम्य बाळगून मोबाईल कमीत कमी वापर करणे व पालकांनी आपल्या मुलांकडे महागडे स्मार्ट फोन न घेऊन देता त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे...

लेखक:विद्यार्थीमित्र नितीन सेलकर (संस्थापक,अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना) मो.नं.7798311136
रा. अल्लीपुर ता.हिंगणघाट जिल्हा.वर्धा