अत्यंत दुःखद !: पत्रकारितेचे धडे घेणाऱ्या युवतीच्या आत्महत्येने खळबळ : एक दिवस आधी फेसबुक वर टाकलीहोती विशिष्ट पोस्ट : कारण अस्पष्ट -कुटुंबावर शोककळा #media and mass communication student commited suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अत्यंत दुःखद !: पत्रकारितेचे धडे घेणाऱ्या युवतीच्या आत्महत्येने खळबळ : एक दिवस आधी फेसबुक वर टाकलीहोती विशिष्ट पोस्ट : कारण अस्पष्ट -कुटुंबावर शोककळा #media and mass communication student commited suicide

Share This
खबरकट्टा /गडचिरोली प्रतिनिधी -

पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली विद्याथिनी समिधा कालीदास राऊत (२०) ही काल(ता.१) च्या रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

समिधा ही गडचिरोली येथील मूळ रहिवासी असून, हिवताप विभागात कार्यरत कालीदास राऊत यांची कन्या, तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची पुतणी आहे. ती पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत होती. सिम्बॉयसिस गर्ल्स होस्टेल, विमाननगर, पुणे येथील रोहिल मिथील इमारतीच्या खोलीत ती राहत होती. 

१ एप्रिलच्या रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी समिधा उपस्थित न झाल्याने व तिच्या खोलीचे दार बंद असल्याने वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने बालकनीच्या बाजूला असलेल्या पॅनलमधून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समिधा खोलीतील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरविले. त्यानंतर डॉक्टर व पोलिसांना पाचारण केले; तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी समिधाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. समिधा राऊत ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. 


मृत्यूच्या आधी एक विशिष्ट फेसबुक पोस्ट तिने टाकली होती त्यामुळे तिचा मृत्युबद्दल शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून, मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेणे अपरिहार्य झाले आहे. आज पहाटे समिधाचे कुटुंबीय पुण्याला रवाना झाले. उद्या(ता.३) संध्याकाळपर्यंत ते समिधाचा मृतदेह घेऊन गडचिरोलीत पोहचतील,असे त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले.