फक्त अन्याय : माणिकगड पीडित देऊ कुळमेथे यांनी घेतला अखेरचा श्वास - अजूनही न्याय नाहीच - जिवंतपणी संघर्ष करुण अपयशी, कुटुंब उघडयावर #manikgarh cement - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

फक्त अन्याय : माणिकगड पीडित देऊ कुळमेथे यांनी घेतला अखेरचा श्वास - अजूनही न्याय नाहीच - जिवंतपणी संघर्ष करुण अपयशी, कुटुंब उघडयावर #manikgarh cement

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना -


                        
गडचांदूर येथील नामांकित माणिकगड सिमेंट कंपनी या कंपनीने कुसुंबी येथील आदिवासी देऊ कुळमेथे यांची जमीन बळजबरी व मुजोरी ने चुनखडी उत्खनन करून त्याची शेती नष्ट केली होती याबाबत शासन-प्रशासन यांच्याकडे अनेक तक्रारी व न्यायासाठी मागणी करून लक्ष वेधले याबाबत न्याय मिळत नाही व प्रशासन लक्ष घालत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायासाठी प्रकरण दाखल केले. याबाबत यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापुढे भीक मागो आंदोलन करून उपचारासाठी निधी गोळा केली होती तात्पुरती जिल्हा रुग्णालयात उपचारही करण्यात आला मात्र अखेर जिल्हाधिकारी डॉक्टर खेमनार यांनी तहसिलदारामार्फत 22 फेब्रुवारीला स्थळदर्शक चौकशी करून अहवाल मागितला मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने सीमांकन चिन्ह दगडा नष्ट केल्याने व मंजूर असलेल्या उत्खनन पट्ट्या पेक्षा अधिक जमीन कंपनीच्या ताब्यात असल्याने तहसीलदार बेडसे पाटील व भूमी अभिलेख निरीक्षक जाधव यांनी स्थळदर्शक पाहणी करून पंचनामा केला.

मात्र दगडा नष्ट झाल्याने नेमका किती जमिनी बळकावल्या याबाबत बोध होत नसल्याचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवला मात्र सतत संघर्ष करूनही अखेर देऊ यांनी आपल्या अखेरचा श्वास घेऊन कुटुंब उघड्यावर पडल्याचा तसेच आठ एकर मालकीची जमीन कंपनीने नष्ट करून चुनखडी उत्खनन केल्याची तक्रार पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी यांच्याकडे दाखल केल्या होत्या.

आमरण उपोषण करून संविधानिक मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र प्रशासनाने अखेर या आदिवासींना न्याय देण्यामध्ये असफल ठरल्याने देऊ कुळमेथे यांनी अखेरचा श्वास घेत आपला संघर्ष संपविली. 

आज मात्र 80 वर्षे वयाची पत्नी ताराबाई मुलगा महादेव व दिपक हे गरिबीशी झुंज देत असून रोजंदारी कामावर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे संचारबंदी लॉक डाऊनलोड झाल्याने अनेक अडचणी सोबत हे कुटुंब संघर्ष करीत आहे देऊ यांच्या मृत्यूला माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन जबाबदार असून शोषण व अत्याचारामुळे यांचा मृत्यू घडल्याचा आरोप कुटुंबाने केला असून माणिकगड सिमेंट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.