संचारबंदीत देखील, महावितरणच्या ग्राहकांना मिटर रिडींगनुसार येतील बिले #MAHAVITARAN MOBILE APP - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संचारबंदीत देखील, महावितरणच्या ग्राहकांना मिटर रिडींगनुसार येतील बिले #MAHAVITARAN MOBILE APP

Share This
संचारबंदीत देखील, महावितरणच्या ग्राहकांना मिटर रिडींगनुसार येतील बिले

खबरकट्टा / महाराष्ट्र : जाहीर सूचना -

वरील बातमी वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असेल. संचार बंदी लागू असतांना ग्राहकांचे मीटर रिडींग कसे होईल? मिटर रीडर ग्राहकांच्या घरी जाऊन मिटर रिडींग कसे काय घेऊ शकतील?

तर कुठलाही मिटर रीडर ग्राहकांच्या घरी जाणार नाही तरी ग्राहकांना मिटर रिडींग नुसार वीज देयके जातील.

कारण महावितरणने संचारबंदीच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

Mahavitaran Mobile App व्दारे ग्राहक घरबसल्या आता आपले मिटर रिडींग पाठवू शकतात आणि रिडींग नुसारच देयक घेऊ शकतात.

नुकतेच Mahavitaran Mobile app चे नवीन version 6.90 खास ग्राहकांसाठी उपलब्ध केलेले आहेत, यामध्ये ग्राहकांना आपले रजिस्ट्रेशन करण्याची देखील आवश्यकता नाही केवळ Guest म्हणून देखील आपले रिडींग सबमिट करू शकतात. यामध्ये ग्राहकांना आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर महावितरण कडे नोंदलेला असणे आवश्यक आहे._

ज्यांचा मोबाईल नंबर नोंदलेला नसेल असे ग्राहक देखील आपले रिडींग रजिस्ट्रेशन करून सबमिट करू शकतात.


ग्राहक रिडींग कधी पाठवू शकतात?
ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरण कडे नोंदलेले आहेत त्यांना रिडींग सबमिट करण्याचे संदेश पाठवले जाईल असे ग्राहक मॅसेज मिळाल्यापासून ५ दिवसात रिडींग पाठवू शकतात.

ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरण कडे नोंदणी झालेले नसतील त्यांना मॅसेज पाठविला जाणार नाही.._
त्यांनी आपल्या मागील महिन्याच्या किंवा जुन्या बिलावरील " चालू महिन्याचे रिडींग तारीख " बघावी म्हणजे त्या तारखेच्या किमान एक दिवस आधीपासून असे पाच दिवसात रिडींग सबमिट करू शकतात.


रिडींग कसे सबमिट करावे?
रिडींग सबमिट करण्यासाठी ग्राहकांनी सर्वात प्रथम Google Play Store वरून MAHAVITARAN MOBILE APP डाऊनलोड करावे.. त्यामधील Guest Users मधून ग्राहक रिडींग सबमिट करू शकतात.

ज्यांना महावितरण कडून मॅसेज येत नसतील त्यांना अँप डाउनलोड करून Registration करणे अनिवार्य आहे.

Registration करण्यासाठी Dont have account? Sign Up या ऑपशन वर क्लिक करावे..

 • 12 digit Consumer No 
 • Mobile No 
 • Email ID 
 • Login Name आणि Password टाकावा.
 • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर SUBMIT READING या टॅब मधून वर सांगितलेल्या मुदतीत ग्राहक रिडींग सबमिट करू शकतात.


नेमके रिडींग कुठले सबमिट करावे?
आपल्या मीटरवरील ज्या रिडींगमध्ये KWH दर्शविलेले असेल ते रिडींग सबमिट करावे.. तसेच ठोकताळा करण्यासाठी आपले मागील महिन्याचे बिलावरील चालू रिडींगशी तुलना करून घ्यावी. (मागील महिन्यापेक्षा मीटरवरील रिडींग जास्त असायला १९१२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून शकता.