मास्क नसेल तर दंडात्मक कार्यवाही ला तयार रहा - सिंदेवाही पोलिसांचा इशारा #lovkdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मास्क नसेल तर दंडात्मक कार्यवाही ला तयार रहा - सिंदेवाही पोलिसांचा इशारा #lovkdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -अमृत दंडवते   :-  

पोलीस स्टेशन सिंदेवाही द्वारे शहरातील शिवाजी चौक येथे दु चाकी आणि चार चाकी वाहनांची तपासणी करून  मास्क नसेल त्यांन च्या वर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

शिवाजी चौक बसस्थानक परिसरात पोलीस प्रशासनाद्वारे दु चाकी , चार चाकी वाहनाने रिकामे बिनकामाने बाहेर फिरणाऱ्या आणि चेहऱ्यावर मास्क नसेल त्यांची पोलीस पथकांनी पुरुष व महिला यांचे येणारी आणि जाणारी प्रत्येक वाहनांची तपासणी करून 200 रुपये प्रती दंडात्मक कार्यवाही केली दंडात्मक कार्यवाहीची ऑनलाइन प्रत सुद्धा देण्यात आली.

वाहनांची ऑनलाइन नोंदणी , ऑफिस वर्कर , आरोग्य अधिकारी यांना तपासणी करून सूट देण्यात आली . मास्क लावा कोरोना टाळा. घरीच राहण्याचा सल्ला दिला. पोलीस प्रशासना चे वतीने राहुल रहाटे,  तुकाराम पवार , मंगेश मातेरे , यांनी प्रत्येक वाहनांची तपासणी करून चेहऱ्यावर मास्क नसलेल्या ना दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.