सर्व धार्मिक कार्यक्रमांना सार्वजनिक रित्या साजरे करण्यास बंदी : आदेशान्वे जिल्हाधिकारी #LOCKDOWN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सर्व धार्मिक कार्यक्रमांना सार्वजनिक रित्या साजरे करण्यास बंदी : आदेशान्वे जिल्हाधिकारी #LOCKDOWN

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जाहीर सूचना -7 एप्रिल 2020-
कोरोना संसर्गामुळे जिल्हयासह संपुर्ण देशात संचार बंदी लागू केलेली आहे, यादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात  माहे एप्रिल व मे 2020 या महिन्यात होनाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी घनश्याम भुगांवकर यांनी 3 एप्रिल ला काढलेले असून सर्व तालुका स्तरावर  या सर्व कार्यक्रमांची यादी दिनांक व विवरणासहित पाठविण्यात आलेले आहेत. 

एप्रिल व मे 2020 या महिन्यांत होणारे सर्व सन, उत्सव, जयंती किंवा इतर धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास परवानगी नाही असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. असे कार्यक्रम सार्वजनिक साजरे न करता आपल्या कुटुंबात घरात राहूनच साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे. यात महाकाली यात्रा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, शब्-ए-बदिरात, गुडफ्रायडे, महात्मा फुले जयंती, ईस्टर संडे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सर्व कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

संचार बंदी व साथरोग नियंत्रण कायदा लागू असल्याने कोणालाही बाहेर पडून कार्यक्रम घेता येणार नाहीत असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.