धक्कादायक : साहेब त्या अधिकाऱ्यांना तिथेच थांबवा - मुलवासीयांची मागणी : दोन शासकीय कर्मचारी पूर्वसूचना न देताच कोरोना ग्रस्त जिल्ह्यात गेले -कोणतीही खबरदारी न घेता गुपचूप परतीच्या मार्गावर - लॉकडाऊन सुरु असताना मुख्यालयी राहणे टाळून जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली कोणी??? #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक : साहेब त्या अधिकाऱ्यांना तिथेच थांबवा - मुलवासीयांची मागणी : दोन शासकीय कर्मचारी पूर्वसूचना न देताच कोरोना ग्रस्त जिल्ह्यात गेले -कोणतीही खबरदारी न घेता गुपचूप परतीच्या मार्गावर - लॉकडाऊन सुरु असताना मुख्यालयी राहणे टाळून जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली कोणी??? #lockdown

Share This
लॉकडाऊन असताना मूलचे दोन शासकीय कर्मचारी कोरोनाग्रस्त जिल्ह्यातीत जाऊन आता परत मूल कडे येण्यास निघाले असल्याची काही नागरिकांना माहिती होताच त्यांना जिथे असतील तिथेच थांबविण्याची विनंती मुलवासी करीत आहेत. मूलचे दोन शासकीय कर्मचारी पूर्वसूचना न देताच कोरोना ग्रस्त जिल्ह्यात गेले असल्याने प्रशासनाच्या कारवाईकडे मूलवासीयांचे लक्ष लागले आहे. खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -
कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासन कडक धोरण अवलंबत असतानाच, दुसरीकडे मात्र काही कर्मचारी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर कोरोनाग्रस्त जिल्ह्यात जाऊन गुपचूप परत येत असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे्.

लाॅकडाऊन असताना हे दोन्ही कर्मचारी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून गेले कसे? यावरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मुल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे कार्यरत अभियंता सुनील राठोड आणि आणि मुल नगर परिषदेत कार्यरत कर्मचारी प्रसाद राठोड हे ते दोन कर्मचारी आहेत. मागील चार-पाच दिवसाचे अगोदर आपले स्व गावी वाशिम येथे व सोबतच सुनील राठोड हे रत्नागिरी आणि  पुणे येथे गेलेत. तेथून ते परतीच्या मार्गावर असून सकाळपर्यंत मुल  येथे पोहोचण्याची शक्यता आहे.लाॅकडाऊन केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचा शिरकाव होऊ नये म्हणून सगळीकडे नाकेबंदी केली आहे, असे असतानाही प्रशासनातील हे दोन कर्मचारी कोरोना ग्रस्त जिल्ह्यात जाऊन परत येत असल्याने मूल शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभियंता सुनील राठोड यांची आजी अस्वस्थ असल्याने ते रत्नागिरी येथे गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. रत्नागिरी येथे गेल्यानंतर फोनवर त्यांनी ही माहिती दिली. आल्यानंतर त्यांचे काॅरनन्टाईन केले जाईल श्री. वसुले, उपविभागीय अभियंता. सां.बा. उपविभाग मूल.
नगर परिषदेचे कर्मचारी प्रसाद राठोड हे आपले स्वगावी वाशिम येथे गेल्याची माहिती आजच मला  मिळाली. तब्येत चांगली नसल्याने ते कार्यालयात येत नव्हते. ते कोरोणाग्रस्त जिल्ह्यात गेले असल्याने, सध्या इकडे परत येऊ नये अशी सूचना त्यांना दिली आहे - विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, नगर परिषद मुल.