चंद्रपूर जिल्ह्याला ग्रीनझोन मधेच ठेवायचे असेल तर..... सिमेंट उद्योगातून राज्यातील इतर जिल्ह्यात होणारी सिमेंट वाहतूक तात्काळ बंद करा : जिल्ह्यातील सीमावर्ती वनोजा वासियांची निवेदनातून मागणी #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्याला ग्रीनझोन मधेच ठेवायचे असेल तर..... सिमेंट उद्योगातून राज्यातील इतर जिल्ह्यात होणारी सिमेंट वाहतूक तात्काळ बंद करा : जिल्ह्यातील सीमावर्ती वनोजा वासियांची निवेदनातून मागणी #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -चंद्रपूर जिल्ह्यातुन सिमेंट वाहतूक राज्यातील इतर जिल्ह्यात सुरू आहे.चंद्रपुर जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये येत असून या जिल्ह्यातून वाहतूक राज्यातील ऑरेंज व रेड झोन असलेल्या जिल्हयात सुरू आहे.त्यामुळे सदर वाहतुक ही तात्काळ बंद करण्यात यावी याकरिता जिल्ह्यातील सिमवर्ती भागातील नागरीकांनी कोरपना पोलीस स्टेशन मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपुर व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.


         
जिल्ह्यातील ट्रकवरील ड्रायव्हर व त्यांचे इतर सहकारी ३ ते ४ दिवस इतर जिल्ह्यात जाऊन येतात तसेच गांभीर्याची बाब म्हणजे सदर ट्रकवरील ड्रायव्हर हे इतर जिल्ह्यातून प्रवासी वाहतुक हे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत घेऊन येतात व ते नागरिक अवैध मार्गाने जिल्हयात प्रवेश करतात तसेच सदर नागरिकांची शासकीय दरबारी कुठेही नोंद होत नाही तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा होत नाही. हे नागरिक रेड व ऑरेंज झोन मधून येत असल्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
   
त्यामुळे शासनाने व प्रशासनाने सिमावर्ती भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन चंद्रपुर जिल्ह्यातून होणारी सिमेंट वाहतूक ही तात्काळ बंद करावी अशी मागणी जोर पकडत आहे.
        
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,वनोजा सरपंच सविताताई पेटकर,सत्यवान चामाटे, अनिल मालेकर,राजेश्वर लोहे,गजानन पाचभाई, पुंडलिक चूनारकर,विनोद पेटकर, प्रवीण हेकड,शंकर लोहे,भास्कर मत्ते,रामचंद्र लोहे,चंद्रकांत मत्ते, जानकी राम लोह,नत्थु मालेकर, सचिन सोनवणे, बंडू मुक्के, छाया लोहे, लाविना हेकाड उपस्थित होते.