अन, अल्लीपुरचा तिसराही साप्ताहिक बाजार भरला यशवंत महाविद्यालयातच #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अन, अल्लीपुरचा तिसराही साप्ताहिक बाजार भरला यशवंत महाविद्यालयातच #lockdown

Share This
खबरकट्टा / वर्धा /अल्लीपूर -नितीन सेलकर -देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून अशात संचारबंदी असल्याने अनेक बाजारपेठ बंद झालेल्या आहेत मात्र अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने काही वेळेपूर्ती मर्यादित केली असून अशात ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व जास्त लोकसंख्या असलेल्या अल्लीपुर गावात मागील 3 आठवड्या पासून साप्तहिक बाजार हा आठवडी बाजार येथे न भरू देता तो गर्दी होऊ नये म्हणून यशवंत महाविद्यालयात स्थलांतरित केला गेला आहे.

हा बाजार सकाळी 7 ते 12 पर्यंत या वेळेत सुरू असून फक्त आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला या ठिकाणी प्रवेश असल्याचे दिसून आलेले आहे,तर प्रत्येक दुकानं जवळ सॅनिटाइजर व हँडवाश सुद्धा ठेवण्यात आलेले असून बाजारात 18 वर्षावरील च खरेदी करणार्यांना प्रवेश असून प्रत्येकाना "मास्क" हे बंधनकारक असून कोणी "विना-मास्क" ने आढळून आल्यास त्याच्यावर ग्रामपंचायत च्या वतीने 200 रुपये असा दंड सुद्धा आकारण्यात येत आहे.


त्यामुळे कोणताही नागरिक नियमबाह्य वागताना दिसून येत नसून सर्व खरेदीदार कमीत कमीत 1 ते 2 मीटर अंतर ठेवून खरेदी करताना पहावयास मिळत आहे.हे सगळं नियमात ठेवण्यासाठी गावातील प्रशाकीय,शासकीय,व निमशासकीय यंत्रणा सोबत गावातील काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आपल्या गावाच्या हिताचे पाऊल उचलून इथे राबताना दिसत आहे.