जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची तंबी : खबरदार विनापरवानगी फोटो वापराल तर..... !!! #राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाटप चमकेगिरीने त्रस्त : राजकीय पदाधिकाऱ्यांचा बड्या प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ नेत्याचा फोटो वापरून मनपा पदाधिकाऱ्यांचा अजब दावा : सोशल मीडिया वर चमकेगिरी करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल#lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची तंबी : खबरदार विनापरवानगी फोटो वापराल तर..... !!! #राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाटप चमकेगिरीने त्रस्त : राजकीय पदाधिकाऱ्यांचा बड्या प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ नेत्याचा फोटो वापरून मनपा पदाधिकाऱ्यांचा अजब दावा : सोशल मीडिया वर चमकेगिरी करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल#lockdown

Share This

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या छायाचित्रांचा वापर करून समाज माध्यमांवर चमकोगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. छायाचित्रांचा वापर केल्यास गुन्हा दाखल करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिला आहे. 


खबरकट्टा / चंद्रपूर : विशेष -कोरोना संकटात उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांसोबत राजकीय नेत्यांचे छायाचित्र टाकून आमच्यामुळे चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त आहे, असे दावे केले जात आहे. यापार्श्वभूमीवर आता अशा चमकोगिरांवर प्रशासन पाळत ठेवणार आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही एकही कोरानोचा रुग्ण नाही.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी दोघेही वैद्यकीय शिक्षण घेऊन आहे. त्यांच्या या शिक्षणाचा फायदा कोरोना विरोधातील लढाईत झाला. याचाच आधार घेत एका राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यालाही याचे श्रेय दिले. यादोन प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आमच्या नेत्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त आहे, असा दावा यातून केला जात आहे. 

एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, संबंधित नेता आणि स्वतःचे छायाचित्र टाकून ते समाजमाध्यमांवर झळकविण्यातही आले.

कोरोनाच्या संकटात प्रशासनासह सर्वच पक्षाचे नेते, सामाजिक संस्था आणि व्यक्तीशः लोक आपापल्या परीने मदत करीत आहे. मात्र एका पक्षाच्या काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी यातही राजकारण सुरू केले. या पदाधिकाऱ्यांच्या अशा वागण्याचा त्रास या नेत्याला आधीही झाला आहे. 

मात्र नेत्याची मर्जी आपल्यावर राहावी, यासाठी कुठल्याही थराला होणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी याही वेळेला तोच प्रकार केला. याची तक्रार जिल्ह्यातील एका आमदाराने प्रशासनाकडे केली. त्यानंतर पाच दिवसांपूर्वीच महानगर पालिकेतील एका जबाबदार पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.खेमणार यांनी स्वतः तंबी दिली.

त्यानंतर ती 'पोस्ट' सबंधितांने समाज माध्यमातून काढून टाकली. त्यानंतर इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अशा 'पोस्ट चा पाऊस समाज माध्यमावर पाळला आहे.

याप्रकारामुळे जिल्हाधिकारी चांगलेच त्रस्त झाले आहे. अशाचमकोगिरांना आता धडा शिकविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी यांचे छायाचित्र विनापरवानगीने वापरल्यास आयटी अॅक्ट आणि संचारबंदीतील नियमांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. सायबर सेल, अशा 'पोस्ट वर पाळत ठेवणार आहे.


'ते' लाचार नाही, अडचणीत आहेत !

लॉकडाऊनच्या काळात अनेक संस्था, संघटना गरजूंना मदत करीत आहे. मात्र यातील फारच कमी लोक प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मदत देतानाचे छायाचित्र काढल्याशिवाय पदरी पुण्य पडत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. एवढेच नव्हेतर मदत करतानाच्या छायाचित्रांचा धुमाकूळ समाजमाध्यमांवर सुरू आहे.

या प्रसिद्धीलोलुप समाजसेवकांचेही जिल्हाधिकारी यांनी कान उपटले. मदत घेणारे लाचार नाही. ते अडचणीत सापडले आहेत. एवढे ध्यानात ठेवा.

मदत करताना कुणाच्या भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिला.