नशा करणाऱ्यांची गावकऱ्यांनी उतरविली नशा : संचारबंदीत रात्री गावात फिनाऱ्या व्यसनी युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप :LOCKDOWN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नशा करणाऱ्यांची गावकऱ्यांनी उतरविली नशा : संचारबंदीत रात्री गावात फिनाऱ्या व्यसनी युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप :LOCKDOWN

Share This
नशा करायला आले अन गावकऱ्यांनी चोर समजून धुतले

खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजला आहे.राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे.लॉकडाउनमुळे जनसामान्यांचे हाल सुरू आहेत.अश्यातच मद्यपी आणि आंबटशौकिनांची चांगलीच पंचायत झाली आहे.संचारबंदीच्या याही काळात मात्र आपली हौस भागविण्यासाठी हे महाभाग नामी शक्कल लढवीत आहेत.असेच काळोखाचा लाभ घेत आपली हौस भागवण्यासाठी गावबंदी असलेल्या गावात घुसखोरी करणाऱ्या भांमट्याना ग्रामस्थांसह पोलिसांनी चांगलाच चोप दिला.ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात शनिवारी मध्यरात्री घडली.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे.अशातच खबरदारी अन संसर्ग वाढू नये म्हणून प्रशाषणाने कठोर पाऊले उचलली आहेत.यामुळे अवैध धंदेवाईकांची चांगलीच गोची झाली आहे.आपली हौस भागविणाऱ्या आंबट शौकिनांना देखिल लगाम लागला आहे.दारूबंदीनंतरही सहज मिळणारी दारू दिसेनासी झाली आहे.

अश्यातच शनिवारी रात्री स्थानिक गोंडपिपरी शहरातील युवकांना नशा घेण्याचा मोह आवरला नाही.संचारबंदी असल्याने त्यांनी रात्री १० ते ११च्या दरम्यान गोंडपिपरी पासून ७ किलोमीटरवर असलेली वढोली गाव गाठले.यावेळी गावात दिवसभर घरातल्या घरात राहून वैतागलेला महिला पुरुष मंडळींनी घरासमोर बसून मनोरंजनात्मक खेळ चालविले होते.तसे वढोली गावात गावबंदी असल्यामुळे मुख्यमार्ग काटेरी झुडपाणी बंद होता.

यामुळे या युवकांनी गावात आड मार्गने शिरकाव केला.घरासमोर शतपाऊली करणाऱ्या महिलेने तुम्ही कोण ? विचारताच या युवकांनी उद्धट उत्तर दिले.महिलेला शंका आली.आणि चेहरेही कधी न पाहिलेले दिसले.वरून कोरोनाचे संकट.अश्यातही गावबंदी सुरू आहे.मग ही मंडळी इतक्या रात्री गावात करते ? असे एक ना अनेक प्रश्नांनी त्या महिलेच्या मनात घर केले.लागलीच त्या महिलेने 'चोर चोर' म्हणत आरडाओरड सुरु केली.त्या युवकांनी गावाबाहेत शेतशिवाराच्या दिशेने धूम ठोकली.पाहता पाहता गावकरी एकवटले.लाठ्या घेऊन शेतशिवारामार्गे युवकांचा समजून पाठलाग केला.

गावकऱ्यांच्या सजगतेने ते युवक सापडले.गावकऱ्यांनी त्यांना चांगलेच बदडले.त्यानंतर काय ? चक्क गांजा पिण्याकरिता आम्ही वढोली गावात आलो असल्याची कबुली दिली.पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली.


लॉकडाउन असतांनाही या युवकांनी केलेल्या कृत्यांचा पोलिसांचेही माथे भडकले.त्यांनीही सदर युवकांना चांगलाच प्रसाद दिला.यानंतर युवकांच्या आई वडिलांना माहितीसह समज देत सोडण्यात आले.हे तिघेही युवक गोंडपिपरी शहरातील अन प्रतिष्टीत कुटुंबातील असल्याने या प्रकाराची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.