बँकांची मात्र वेगळीच व्यथा - कर्मचाऱ्यांची गैरसोय..!!! -गर्दी आटोक्यात येत नाही - पोलीस विभाग सहकार्य करत नाही : जिवती ठाणेदारचा उलटा नियम सहकार्य देण्याऐवजी तालुक्यातील बँकांना नोटीस : क्षेत्रीय प्रबंधकांची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी. #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बँकांची मात्र वेगळीच व्यथा - कर्मचाऱ्यांची गैरसोय..!!! -गर्दी आटोक्यात येत नाही - पोलीस विभाग सहकार्य करत नाही : जिवती ठाणेदारचा उलटा नियम सहकार्य देण्याऐवजी तालुक्यातील बँकांना नोटीस : क्षेत्रीय प्रबंधकांची जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी. #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहासाठी प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात प्रति महिना 500 रुपये  पुढील तीन महिने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जमा करण्यात येत आहे.  जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांनी विविध बँकामध्ये प्रचंड गर्दी केली़. 

दरम्यान, पैसे काढण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते व महिलांनी बँकांमध्ये गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले़ परंतु शनिवारी 4 एप्रिल पैसे देण्याच्या  पहिल्याच दिवशी बँकामध्ये महिलांची गर्दी उसळली़ ती काल 9 एप्रिल पर्यंत कायम दिसली.  राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेतील अपुऱ्या  कर्मचाऱ्यांना  ‘सोशल डिस्टिन्सिंग’ नियमांचे पालन करून गर्दीला शिस्त लावताना  नाकीनऊ आले़.

हेही वाचा : देशात आर्थिक आणीबाणी लागण्याची शक्यता !

त्यामुळे कोरोनाबाबत महिलांमध्ये गांभीर्य नसल्याचे जाणवले़.प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून जन-धन योजनेंतर्गत खाते असलेल्या महिल्यांच्या खात्यावर 500 रुपये प्रति महिना या प्रमाणे पुढील तीन महिन्यांसाठी पैसे जमा केले जाणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांनी सोशल डिस्टन्सचा वापर करीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करीत बँकेत गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकतर राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्रामीण शाखांमध्ये अधिच सरासरी दोन किंवा तीन असा कर्मचारी स्टाफ आहे त्यात असे शासन घोषित पेमेंट्स, अशिक्षित खातेदार व एकाचवेळेस उसळणारी गर्दी हे बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लावणारे ठरते. 

शिवाय जिल्ह्यातील सर्वच बँकांनी सॅनिटायझेशन व रांगा लावण्याकरिता एक मीटर अंतर ठेऊन खातेदारांना उभे राहण्याकरिता वर्तुळे आखल्याचे नियोजन आहे. जिथे जागा कमी आहे त्या काही शाखांनी बाहेर कापडी पेंडाल टाकून खातेदारांची सोशल डिस्टन्स पाळण्याची सोय केली आहे.  बँकांमध्ये 2 किंवा 3  व्यक्तींना आत सोडण्यात येत आहे. तरीही बाहेर अतोनात गर्दी उसळून पडत असून कर्मचारी सोय लावता लावता हतबल होतानाचे अधिकतर चित्र आहे.

सदर बाब लक्षात घेऊन अनेक बँकांच्या क्षेत्रीय प्रबंधकांनी जिल्हाधिकारी यांना सर्व शाखांमध्ये सतत निर्जंतुकीकरण करून देण्याच्या मागणीसहित जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना बँक कर्मचारी व शाखांना येणाऱ्या या सर्व परिस्थितीजन्य अडचणी अवगत करून देत सर्व शाखांमध्ये पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी सुद्धा केली आहे. परंतु काही तालुका स्तरावरील ठाणेदारांनी गर्दी जुमानत नसूनही सेवा देण्याऐवजी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच अरेरावी सुरु केल्याच्या घटना घडत आहेत शिवाय त्यांना कलम 149 अंतर्गत कार्यवाहीच्या नोटीस दिल्या आहेत. 

वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांना प्रशासनाने गर्दी व गैरसोयीची शक्यता लक्षात घेऊन सुविधा पुरविणे अपेक्षित असून सुविधा देण्याऐवजी उलट त्यांना नोटीस देऊन जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न पोलिसांकरवी सुरु असल्याची प्रतिक्रिया एका राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांनी दिली असून देश संकटकाळातून जात असताना शासनाच्या सर्व विभागांनी एकमेकांना योग्य सहकार्य करणे अपेक्षित असले तरीही काही खात्यांची मनमर्जी अजूनही संपुष्टात आली नसल्याचे दिसते.