महत्वाची बातमी ::कोरोनाचे चंद्रपूर जिल्ह्यात पॉझटीव्ह इफेक्ट - नक्की वाचा #LOCKDOWN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महत्वाची बातमी ::कोरोनाचे चंद्रपूर जिल्ह्यात पॉझटीव्ह इफेक्ट - नक्की वाचा #LOCKDOWN

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ते आधीच केले होते, त्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. वाहतूक ,वाहने संपूर्ण ऑफिसेस बंद करण्यात आल्याने याचा मोठा परिणाम हवामानाच्या गुणवत्तेवर झाल्याचं पाहायला मिळते. दररोजच्या हवा गुणवता निर्देशांक नुसार, हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी चांगली कमी झाली आहे.चंद्रपुर मध्ये २०१९ च्या मार्च च्या तुलनेत २०२० मध्ये ४८.२ टक्के धूळ प्रदूषण कमी झाले आहे. 

चंद्रपुर २०१९ मार्च -२५-२२९एक्यूआय,मार्च-२६-१३१, मार्च -२७-१३० मार्च-२८-१२७ मार्च-२९-१४० मार्च-३०-१४१ मार्च-३१-१४४ एप्रिल-१-१५० चंद्रपुर एपीआय २०२०(१० पीएम मार्च २५ -५५एपीआय मार्च २६-७८ मार्च २७-८३ मार्च २८-७१ मार्च २९-९० मार्च ३०-६३ मार्च ३१-५९ एप्रिल १-५ २०१९ चंद्रपुर ए क्यु आय २.५ पी एम २५ मार्च-५ २६ मार्च-५३ , २७ मार्च-५६ २८ मार्च-६६ २९ मार्च-६६ ३० मार्च-६४ ३१ मार्च-६२ १ एप्रिल-५०, २०२० चंद्रपुरए क्यु आय (२.५ पी एम २५ मार्च-३० २६ मार्च-२३ २७ मार्च-३७
२८ मार्च-४०,२९ मार्च-४३ , ३० मार्च-४२ , ३१ मार्च-३२
१ एप्रिल-२७ एक्यूआय.

दिल्लीत प्रदूषणाची पातळी ३० टक्क्यांनी तर पुणे आणि अहमदाबादमुळे १५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

ती ह्या आठवड्यात पुन्हा कमी झाली.गेल्या आठवड्यात प्रदूषणाची पातळी चंद्रपुरात ४८.टक्के ने कमी झाली आहे.


श्वसनासाठी धोका वाढवू शकणार्‍या, नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळीदेखील कमी झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईडचं प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होतं. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी झालं आहे. तर मुंबईत ३८ टक्क्यांनी आणि अहमदाबादमध्ये ५० टक्क्यांनी कमी झालं आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करतायेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणार्‍या पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे. 

वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाली आहे. कधीही न थांबणारी मुंबई, पुणे, अहमदाबाद सारखी अनेक मोठी व्यापारी शहरं कोरोनामुळे ठप्प झाल्याने याचा परिणाम हवेतील प्रदूषणावर होतोय. गेल्या कित्येक वर्षात मोकळा श्वास न घेतलेली मुंबई, अहमदाबाद, पुणे यांसाखी अनेक मोठी शहरं लॉकडाऊनच्या निमित्ताने मोकळा शांत झालेली, मोकळा श्वास घेतना दिसतायेत.मार्च २०१९ मध्ये मुंबईतील हवा एक्यूआय १५३ होती. 

मात्र आता, २०२० मार्च महिन्यात मुंबईतील वायुची शुद्धता एक्यूआय ६६ इतकी नोंदवण्यात आली आह्रे. दिल्ली प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट होती. प्रदूषणाचा स्थर इतका खालावला होता की, लोकांना रस्त्यांवरुन चालताना मास्क लावून चालावं लागत होतं. 

पण लॉकडाऊननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर हवामानाची स्थिती चांगली, वायूप्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली.चद्रपूर ,नागपूर,महाराष्ट्र आणि देशातच प्रदूषण ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे,पक्षी शहरात वापस येताना दिसत आहे, अशी माहिती ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

कोरोना रोखण्यासाठी लॉक डाउन मुळे चंद्रपुर, महाराष्ट्रात प्रदूषण कमी झाले आहे.