चंद्रपूर ब्रेकिंग : डॉ. कुबेर यांच्या दवाखान्यात मृत रुग्णाच्या नातेवाईकांची तोडफोड :!#KUBER - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : डॉ. कुबेर यांच्या दवाखान्यात मृत रुग्णाच्या नातेवाईकांची तोडफोड :!#KUBER

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :जिल्ह्यातील नामवंत डाँ. कुबेर यांचे रुग्णायलात आज सकाळी उपचार दरम्यान एका तरुण रुग्णाचा म्रूत्यू झाल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी दवाखाना इमारतीत निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तोडफोड केल्याचा प्रकार घडला. 


माहिती नूसार असे कळते कि 26 मार्चला राकेश यादव नावाचा 37 वर्षिय युवकाला लिव्हर खराब चा त्रास होता  म्हणून उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याची तब्येत अधिक खराब झाल्यामुळे त्यांस तात्काळ भरती हाेण्यांचा सल्ला दिला .नंतर लगेच त्यास  अतिदक्षता विभागात ठेवून त्याचेवर उपचार करणे सुरु ठेवले.या रुग्णांचे लिव्हर खराब झाल्याचे निदान असून मागिल वर्षात ताे नागपूर स्थित आँरेज सिटी हॉस्पिटल ला उपचार घेत हाेता असेही कळते. 

परंतु रुग्णांचा प्राण डाँक्टरांच्या निष्काळजी पणामुळे झाला हे कारण समाेर करुन चक्क रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठून तेथील अतिदक्षता विभागाच्या मुख्य दाराचे काचे फाेडली या मुळे काही प्रमाणात नुकसान झाले.  अचानक घडलेल्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली हाेती.

नातेवाईकांनी रुग्णालयात गाेंधळ घातल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी भयभीत होऊन घटनेचे गांभिर्य लक्षात घेता लगेच पाेलिसांना पाचारण करण्यांत आले. पाेलिस कुठलाही विलंब न लागता  घटनास्थळी दाखल झाले .नंतर रुग्णालयातील मृतकाचे शव नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यांत आले आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा स्वास घेतला.