अखेर बीबी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित : लवकरच सदर दुकानातील कार्डधारकांना लगतच्या दुकानासोबत जोडणार - श्री. माकोडे, पुरवठा निरीक्षक, कोरपना : शासकीय मानकापेक्षा kami धान्य मिळत असल्याची कार्डधारकांची होती तक्रार #lockdown#bibi-rashn-merchant-suspended - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर बीबी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित : लवकरच सदर दुकानातील कार्डधारकांना लगतच्या दुकानासोबत जोडणार - श्री. माकोडे, पुरवठा निरीक्षक, कोरपना : शासकीय मानकापेक्षा kami धान्य मिळत असल्याची कार्डधारकांची होती तक्रार #lockdown#bibi-rashn-merchant-suspended

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना -


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात टाळेबंदी आहे. अश्यातच अनेक रोजंदारी, मजुरांच्या हातचे काम गेले असून अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. म्हणून केंद्र व राज्य सरकार तर्फे काही प्रमाणात मदत म्हणून राशन कार्ड धारकांना मोफत व काही कमी किमतीती धान्य पुरवठा केल्या जात आहे. मात्र आधीच धान्याच्या काळाबाजारीत अडकलेल्या काही सरकारी स्वस्त धान्य दुकानातून याही संकटकाळात राशन कार्ड वर नोंदणी सदस्यांच्या सरकारी मानकानुसार धान्य पुरविल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून महसूल विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

राज्याच्या नागपूर महसूल विभागात कालपर्यंत एकूण 5 गुन्हे नोंदविण्यात आले असून 18 रेशन दुकानांचे निलंबन तर 1 दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11 दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून त्या खालोखाल वर्धा 4 दुकानांवर कार्यवाही झालेली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची एकमेव कार्यवाही नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

त्यात भर म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बीबी या गावातील महालक्ष्मी महिला बचत गटातर्फे चालविल्या जाणाऱ्या सरकारी रास्त धान्य दुकानाबाबत निकषापेक्षा कमी धान्य वाटप केल्याच्या गावातील राशन कार्ड धारकांच्या तक्रारीनुसार चौकशीअंती सदर दुकानावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तालुका पुरवठा निरीक्षकांकडे पोहोचले आहेत. 

सदर प्रकरणाबाबत टीम खबरकट्टा ने कोरपना तालुका पुरवठा निरीक्षक श्री. माकोडे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. 

बीबी गावातील स्वस्त धान्य दुकानावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश असलेला ई-मेल आज सकाळी जिल्हा पुरवठा कार्यालयातून प्राप्त झाला असून, पुढील आदेशापर्यंत सदर दुकान निलंबित ठेवण्यात येऊन कार्ड धारकांची गैरसोय होऊ नये म्हणून या दुकानाशी जोडल्या गेलेल्या कार्ड धारकांना लगतच्या गावातील दुकानाशी जोडण्यात येईल - श्री. माकोडे, तालुका पुरवठा निरीक्षक, कोरपना (दूरध्वनीवरून )


जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आदेशात बीबी येथील स्वस्त धान्य दुकानात अनियमितता आढळून आल्याचे म्हटले आहे.अत्यंत गंभीर बाब म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत शासनाने ठरवलेल्या मानकापेक्षा कमी अन्नधान्य वितरित करण्यात आल्याचा ठपका देखील या आदेशात लावला आहे. ज्यांच्या नावाने कार्ड नाही अशा व्यक्तींना देखील अन्नधान्य वाटप करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे शासनाने दिलेल्या अन्नधान्य पेक्षा कमी अन्नधान्य तिथे आढळून आल्यामुळे आता अन्नधान्यात गैरव्यवहार झाल्याचे  दिसते असे या आदेशात जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मांडले आहे.सदर निलंबित बीबी गावातील दुकानाला  लगतच्या कोणत्या गावातील दुकानासोबत जोडण्यात येईल या संबंधात टीम खबरकट्टा ने विचारणा केली असता आजच(दिनांक 29 एप्रिल 2020) जिल्हा पुरवठा कार्यालयातून ई-मेल प्राप्त झाला असून आतापर्यंत कोरपना तहसीलदार यांचेकडे सदर निलंबन व इतर आदेश फाईल सादर व्हायची असल्याने पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल असेही त्यांनी कळविले आहे. 


बीबी गाव हे चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट ग्राम घोषित असून गावातील तक्रारदाखल महालक्ष्मी महिला बचत गटातर्फे चालविल्या जाणाऱ्या या स्वस्त धान्य दुकानात उपसरपंचांच्या कुटुंबीयांचा समावेश , चालक स्वतः नांदा गावातील ग्रामपंचायत सदस्य असल्याने व नांद्यातील एका ग्रामपंचायत सदस्याला स्कूटी वरून या दुकानातून धान्य कट्टे नेताना बिबिवासीयांनी बघितल्याने  पंचक्रोशीत विविध चर्चाना पेव फुटले होते. सदर निलंबन आदेशाअंती आता तक्रारीत तथ्य असल्याचे समजत आहे. 

सदर प्रकरणात कार्डधारकांनी धान्य कमी मिळत असल्याची तक्रार करताच प्रहारच्या सुरज ठाकरे यांनी चौकशी करण्याकरिता तहसीलदार, जिल्हापुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी ते थेट राज्याच्या महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा केला होता.

बीबी लगतच्या धामणगाव, सोनुर्ली गावातील तक्रार प्राप्त होताच लगेच दुसऱ्या दिवशी कार्यवाही करण्यात आली नेमके याचं प्रकरणात प्रशाशनाकडून दिरंगाई का होत आहे व स्मार्ट ग्राम असलेल्या गावातील लोकप्रतिनिधीनींना हा गरिबांवरचा अन्याय दिसत असूनही गप्प राहणे निंदनीय आहे त्यातल्या त्यात अल्ट्रा टेक कर्मचाऱ्यांचे राशन आता तरी बंद होऊन इतर गरजुंना देण्यात येईल काय?  असा माझा प्रशासनाला सवाल आहे - सुरज ठाकरे, प्रहार प्रतिनिधि, चंद्रपूर