तर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करणार.. पप्पू देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील कामगारांचा संपूर्ण थकीत पगार देण्याची 'जन विकास'ची मागणी #gmc #vijaywadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करणार.. पप्पू देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील कामगारांचा संपूर्ण थकीत पगार देण्याची 'जन विकास'ची मागणी #gmc #vijaywadettiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील सहा महिन्यापासूनचे वेतन थकित होते.यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली होती. याबाबत जन विकास कामगार संघाचे पदाधिकारी कांचन चिंचेकर,सतीश येसांबरे , सतीश घोडमारे,ज्योती कांबळे, रेश्मा शेख, सुनिता रामटेके, तारा ठमके, कविता सागोरे, सपना दुर्गे, मयुरी गांगरेड्डीवार, योगिता नागपुरे ,उषा सातारडे,संतोषी उमरे ,लता चनकापुरे, रजनी चिंचोलकर,भोजराज शेट्टी, यांच्या शिष्टमंडळाने दि.13 एप्रिल 2020  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा विकास निधीतून तीन महिन्याच्या पगारा करिता वैद्यकीय महाविद्यालयाला तातडीने ऋण  देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना दिले. 

त्यामुळे कामगारांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यात तीन महिन्याचा पगार जमा होण्याचे निश्चित झाले.मात्र उर्वरित तीन महिन्याचा पगार मिळणे हा सुद्धा कामगारांचा हक्क आहे. 

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दर महिन्याला नियमित तारखेला पगार मिळतो. तसाच दर महिन्याला पगार मिळणे कायद्याने  कंत्राटी कामगारांचा सुद्धा हक्क आहे.उर्वरित तीन महिन्याचा पगार सुद्धा तातडीने देण्यात यावा अशी मागणी  जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून केली.

या मागणीची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी तातडीने संपर्क साधला व कोरोना आपत्ती मध्ये  लढणाऱ्या कंत्राटी कामगारांची व्यथा त्यांना सांगितली.तसेच याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर कामगारांचे उर्वरित थकीत वेतन देण्याचे आश्वासन  पालकमंत्री वडेट्टीवार यांनी   देशमुख यांना फोन द्वारे दिली.   पालकमंत्री यांनी कामगारांनी किमान वेतनासाठी केलेल्या 52 दिवसाच्या आंदोलनाची दखल घेऊन भ्रष्ट मार्गाने मंजूर केलेले किमान वेतनापेक्षा कमी दराचे कंत्राट रद्द केले. 


त्यांनी  अडचणीच्या वेळी कर्तव्यतत्परता दाखवून कामगारांना खनिज विकास निधीतून ॠन देऊन पगार देण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे उर्वरित संपूर्ण  थकीत पगार देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पाळल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू अशी माहिती जन विकास चे अध्यक्ष देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.