खबरकट्टा / चंद्रपूर : विरूर स्टेशन-
थोडक्यात वृत्त -
राजुरा तालुक्यातील साखरवाही येथील बाळू सोनिराम लोखंडे वय 38 वर्ष या व्यक्तीचा आज विरूर पोलीस ठाणे अंतर्गत भेंडाळा- बेरडी या रोडवर संशयास्पद मृत्यूदेह आढळला असून ठाणेदार तिवारी साहेब यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत शव ताब्यात घेतले असून घटना स्थळी जाऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राजुरा येथे पाठविण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा काल कामाला जात असल्याचे सांगून साखरवाही येथून आपल्या घरून सायकल घेऊन निघून आला मात्र रात्री घरी न आल्याने आज शोधाशोध केली असता भेंडाळा बेरडी रोडवर तो पडून असल्याचे आढळले.
दरम्यान परिसरात विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची चर्चा असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता.
दरम्यान परिसरात विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची चर्चा असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता.