खबरकट्टा / चंद्रपूर -राजुरा :
शेतात ठेऊन असलेल्या तनसाच्या ढिगार्याला अज्ञात इसमाने आग लावल्याने तनसाचा ढिगारा जळून खाक झाला. ही घटना राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतशिवारात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
गोवरी येथील शेतकरी सुधाकर गोसाई लोहे यांनी शेतात जनावरांसाठी तनसाची सोय करून ठेवली होती. ते दोन दिवसात तनिस घरी आणून ठेवणार होते. मात्र आज सकाळी शेतकरी सुधाकर लोहे हे शेतात गेले असता त्यांना तनसाचा ढिगारा जळल्याचे निदर्शनात आले. या घटनेची माहिती लोहे यांनी गावकर्यांना दिली.
सुधाकर लोहे यांचे शेत गावाजवळ अगदी लागून असल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली.पावसाळ्यात जनावरांचा चारा मिळत नसल्याने लोहे यांनी चार्याची सोय केली होती. मात्र अचानक जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तनसाच्या ढिगारा जवळ शेती उपयोगी कोणत्याही वस्तू ठेवल्या नव्हत्या, अन्यथा शेतकर्यांचे सर्व अवजारे जळून खाक झाले असते.
तनिस जळून खाक झाल्याने शेतकर्यांपुढे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला असून अज्ञात इसमाने तनसाचा ढिगारा जाळल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा गोवरीचे तलाठी सुनील रामटेके यांनी पंचनामा केला असून शासनाने शेतकर्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी श्रीधर जुनघरी, धनंजय लोहे, प्रमोद लांडे, भूषण जुनघरी, चेतन बोभाटे, संतोष जुनघरी, नागेश्वर ठेंगणे, प्रभाकर जुनघरी, योगेश जीवतोडे, मनोज वासाडे, केतन बोभाटे, समीर इटकेलवार, आकाश नांदेकर, विशाल इटकेलवार, कुणाल लोहे यांनी व गावकर्यांनी केली आहे.