नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला तलाठी हनुमंत बेंबरकर यांची मारहाण : पीडित गरोदर महिला तलाठ्यास पोलीस ठाण्यात निंदनीय वागणूक : राजकीय दबावातून बेंबरकर यांच्या विरोधात FIR घेण्यास नकार : गरोदर महिलेस मारहाण प्रकरणात फक्त अदखलपात्र गुन्हा का?#harrassment-at -workplace-with-pregnent-Colleague - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला तलाठी हनुमंत बेंबरकर यांची मारहाण : पीडित गरोदर महिला तलाठ्यास पोलीस ठाण्यात निंदनीय वागणूक : राजकीय दबावातून बेंबरकर यांच्या विरोधात FIR घेण्यास नकार : गरोदर महिलेस मारहाण प्रकरणात फक्त अदखलपात्र गुन्हा का?#harrassment-at -workplace-with-pregnent-Colleague

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -चिमूर तालुक्यात तलाठी या पदावर कार्यरत गरोदर महिलेस शुल्लक राजकीय कारणावरून सहकारी तलाठ्याने मारहाण केल्याची घटना 15 एप्रिल रोजी घडली असता त्याची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या या पीडित गरोदर महिलेला पोलीस ठाण्यात निंदनीय वागणूक देऊन एफआयआर न घेता अदखलपात्र गुन्हा दाखल करून महिला अत्याचाराला चालना देण्याचा प्रकार राजकीय दबावातून घडलेला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.अधिक माहिती नुसार तलाठी या पदावर  गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत चिमूर तालुक्यातील सर्वात पहिली महिला तलाठी असलेल्या रंजना ढोले ह्या सध्या म्हसली या साज्याला 4 वर्षांपासून कामावर आहे. 14 मार्च 2020 ला सिंदेवाही येथे विदर्भ पटवारी संघटना चिमूर तालुक्याची अध्यक्ष पदाकरिता निवडणूक होती यात तलाठी ठोंबरे व तलाठी बेंबरकर या दोघांनी नामांकन दाखल केले.

या मतदानाच्या दिवशी ठोंबरे यांना 29 मते मिळाली व बेंबरकर यांना 28 मते मिळाली आणि निवडणूक पार पडली त्यात अध्यक्ष पदासाठी रंजना ढोले यांनी माजी पटवारी अध्यक्ष हनुमंत बेंबरकर यांना मतदान न केल्याने व दिनांक. 15/04/2020 ला दुपारी 1 वाजता मंडळ अधिकारी कार्यालय चिमूर येथे मंडळ अधिकारी तिडके यांनी मोबाईल द्वारे फोन केले असता रँडम कार्ड आणण्यासाठी तलाठी रंजना ढोले या गेल्या होत्या. 


तेव्हा ठिकाणी आधीच बसून असलेल्या बेंबरकर तलाठ्यांनी निवडणूकीची चर्चा व चार्ज घेण्यासाठीची तयारी सुरू होती नंतर त्याठिकाणी अचानक बेंबरकर चिडले व नऊ  महिन्याच्या गरोदर तलाठी रंजना ढोले यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता सलवार खिचुन मारहाण केली अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असे पीडितेने  बयान केले आहे.

याबद्दल चिमूर पोलीस स्टेशन सायं 5  वाजता सुमारास तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची  तक्रार 6 तास घेण्यात आली नाही व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत त्यांना फक्त पोलीस स्टेशनला गरोदरपणात बसवून ठेवण्यात आले. त्यांना शारीरिक त्रास व्हायला लागल्यावर शेवटी  रात्री 11 :27  वाजता तक्रार घेत  दखलपात्र ( FIR ) या गुन्ह्याची नोंद न करता अदखलपात्र ( NCR ) गुन्हा दाखल करण्यात आला.

यामुळे महिला सुरक्षित कशा हा ? चिन्ह महिलांना निर्माण झाला आहे.आशा बेजबाबदार तलाठ्यावर शासकिय नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी.अशी मागणी तलाठी रंजना ढोले यांनी केली आहे.