कर्जबारारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या : रवींद्र पिंपळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू #farmersuicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कर्जबारारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या : रवींद्र पिंपळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू #farmersuicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :भद्रावती :  भद्रावती तालुक्यातील पानवडाळा येथील शेतकरी रविन्द्र महादेव पिंपळकर 46 वर्षे या शेतकऱ्याने शेतीतील सततची नापिकी आणि वाढणारा कर्जबाजारीपणा यामुळे राहत्या घरीच विष प्राशन करुन आत्महत्या केली. शेतकरी रविन्द्र पिंपळकर यांचा चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. 

 शेतकरी रविन्द्र महादेव पिंपळकर यांचेकडे 3एकर जमीन असून यावरच पूर्ण कुटुंबाची उपजीविका होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई  असून एका मुलीचे लग्न झाले. त्यांच्यावर बँकेचे 66  हजार रुपयाचे कर्ज, बचत गटाचे 50  हजार रूपयाचे कर्ज आणि नातेवाईकांकडून घेतले हातउसनी रक्कम कशी परत करायचे या चिंतेत रविन्द्र पिंपळकर सतत राहात असल्याने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेतल्याचे ग्रामस्थानी पोलीस पंचनाम्या दरम्यान सांगीतले.