EMI सवलतीच्या नावाखाली बँकांची लूटमार, कर्जदाराला अतिरिक्त व्याज द्यावे लागणार : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

EMI सवलतीच्या नावाखाली बँकांची लूटमार, कर्जदाराला अतिरिक्त व्याज द्यावे लागणार :

Share This
खबरकट्टा / आर्थिक -

रिझर्व्ह बँकेने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चला निर्देश जारी केले होते. सर्व बँक ग्राहकांना EMI चे हप्ते भरण्यासाठी 3 महिन्यांची सवलत द्यावी. मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते कापले जाऊ नयेत आणि ही रक्कम नंतर घेण्यात यावी. बुधवारी बहुतांश बँकांनी याबाबत आपापल्या निर्णयांची घोषणा केली, मात्र अनेक बँकांनी EMI कापला आहे. लोकांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनेक बँकांनी EMI बाबत दिशानिर्देश जारी केले आहेत. ज्यांना सवलत हवी आहे त्या ग्राहकांना काय करावे लागेल आणि तीन महिन्यांचे हप्ते न भरल्यास किती अतिरिक्त व्याज द्यावे लागेल, याची माहिती निर्देशांत दिली आहे. 

सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता SBI, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, IDBI, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी आपल्या करदात्यांना मुभा देत EMI तीन महिने पुढे ढकलले आलेत. 

एसबीआयने उदाहरण देत सांगितले की, संबंधित ग्राहकाकडे 30 लाख गृह कर्ज आहे आणि ते फेडण्याचा अवधी 15 वर्षे शिल्लक आहेत, ते तीन महिन्यांची सूट घेत असतील तर 2.34 लाख रुपये अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. ही रक्कम 8 हप्त्यांसमान आहे. अशा पद्धतीने एखाद्या ग्राहकाने 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे आणि ते फेडण्यासाठी 54 महिन्यांचा अवधी शिल्लक असेल तर सवलत अवधीचा पर्याय निवडल्यास त्याला 19 हजार रुपये अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. ही रक्कम दीड टक्के अतिरिक्त EMI समान आहे.

कर्जदारांना व्यक्त केली नाराजी
बँकांच्या या निर्णयावर कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हप्त्याची मुदत आणखी पुढे वाढवण्यात यावी पण अतिरिक्त व्याज लावू नये अशी मागणी होत आहे. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेल्याने आणि अनेक लोक घर किंवा संबंधित मालमत्ता भाड्याने देऊन त्यातून आलेल्या पैशातून हप्ते भरते. मात्र लॉकडाऊन काळात हप्ते मागावे कसे आणि अतिरिक्त व्याजाची रक्कम कशी जमवाववी या विवंचनेत कर्जदार अडकले आहेत.

कर्ज इतिहासावर परिणाम नाही
सवलत अवधी घेण्यासाठी बँकेला माहिती द्यावी लागेल
एसबीआयनुसार, 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 दरम्यान मुदत कर्जाचे हप्ते स्थगित करण्यासाठी पाऊल उचलले आहे आणि रिपेमेंटचा अवधी तीन महिन्यांनी वाढवला आहे. या अवधीसाठी चालू भांडवल सुविधेवर व्याजही 30 जूनपर्यंत द्यावे लागणार नाही. स्थगिती अवधीत 3 हप्ते न भरल्यास ग्राहकाच्या कर्ज इतिहासावर परिणाम होणार नाही. तुम्हाला आपल्या कर्जाच्या हिशेबाने फॉर्म भरून एसबीआयला मेल करावा लागेल.

कर्ज अवधी 3 महिने वाढेल, पण…
कर्जाचा अवधी तीन महिन्यांनी वाढेल. तीन महिन्यांदरम्यान लागणारे व्याज पुढे वसूल होईल. पुढेही हप्त्यासोबत व्याज समायोजित केले जाईल. 1 मार्चआधी कोणता ओव्हरड्यू असेल तर भरावा लागेल. जुना हप्ता टाळला जाणार नाही. हप्ता न भरल्यास दंड लागेल.

HDFC बँकेचे मोरेटोरियम (moratorium) चे मॅसेज पण ग्राहकांची अशी  होत आहे फसवणूक 

प्रायव्हेट बँक असणाऱ्या HDFC बँकेतूनही अनेकजण लोन घेत असतात. या ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे HDFC बँक आपल्या ग्राहकांना दिलासा देणार का याबाबत कर्ज ग्राहकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात होती. अशात आता HDFC बँकेकडून लोक अकाउंट होल्डर्स म्हणजेच कर्ज ग्राहकांना दिलासा मिळालाय. या बाबतचे मेसेजेस आज अनेक HDFC ग्राहकांना आले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर HDFC कडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  यामध्ये तुम्ही बँकेच्या EMI वर moratorium म्हणजेच कर्जफेड पूढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार वापरू शकतात. अशात तुम्हाला जर तुमचे कर्जाचे हफ्ते पुढे ढकलायचे असतील तर HDFC बँकेशी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे.

मात्र त्या आधी जाणून घेऊयात कुणाला मिळेल 'या' सुविधेचा लाभ  

EMI पुढे ढकलण्याचा लाभ 'त्या' सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांनी १ मार्च २०२० च्या आधी बँकेकडून कर्ज घेतलंय किंवा किरकोळ पत सुविधेचा लाभ घेतायत असे सर्व ग्राहकांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय.   

त्यामुळे आता HDFC बँकेने देखील आपल्या ग्राहकांना EMI मोरेटोरियम आणि क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात मोठा दिलासा दिलाय. यासाठी तुम्हाला कर्जाचा हफ्ता पुढे ढकलण्यासाठीची सहमती द्यावी लागेल. यासाठी 022-50042333 किंवा 022-50042211 नंबरवर फोन करून तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्यासाठी सांगू शकतात.
परंतु काय आहे ग्राहकांचा प्रत्यक्ष अनुभव -
परंतु HDFC बँकेने दिलेल्या या राष्ट्रीय अधिकृत क्रमांकावर -कॉल सेन्टर वर संपर्क होत नाहीये शिवाय मोरेटोरियम चा मॅसेज आल्यावर त्यावर EMI कापायची नसल्याचा रिप्लाय दिल्यावर बँकेकडून YES कळविण्यात आले व EMI पुढे ढकलण्यात आल्याचा मॅसेज बँकेकडून मिळाला तरीही EMI कापण्यात आली. त्यानंतर बँकेतील रेलशनशिप मॅनेजर ला कळविल्यावर त्याने  "तुमचे खाते ज्या शाखेत असेल तिथे कळवने गरजेचे होते असे उत्तर दिल्याने मॅसेज पाठवून बँक ग्राहकांची फसवणूक करीत आहे " असे चंद्रपुरातील एका ग्राहकाने टीम खबरकट्टा ला सांगितले आहे.