मोझरी शेकापूर सह परिसरात भूकंप सदृश्य झटका.#earthquake - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोझरी शेकापूर सह परिसरात भूकंप सदृश्य झटका.#earthquake

Share This
खबरकट्टा / अल्लीपुर -नितीन सेलकर 

मोझरी शेकापुर सह परिसरात आज दुपारी 3:20 वाजता दरम्यान भूकंप सदृश्य आवाज सह हलके झटके नागरिकांना जाणवले त्यामुळे अनेक गावातील नागरिक घाबरून घराबाहेर निघाले. दुपार चा वेळ असल्यामुळे अनेक नागरिक घरामध्ये च होते. त्यामुळे हलका झटका अनेकांना जाणवला तर घरातील भांडे, छतावरील टीना काम्पन झाले. 

त्यामुळे मोझरीशेकापुर,  कानगाव,  खानगाव, भैय्यापूर,  वरुड, कोसर्ला सह गावातील नागरिक भयभीत झाले होते. याबाबत तलाठी कडून जिल्हाधिकारी वर्धा कडे दिल्याचे समजते. हलके झटका मुळे कुठेही नुकसान झालेले आढळून आले  नाही.