लॉकडाऊन मध्ये गावठी ची वाढती डिमांड - दोन धाडीत तीन लाखाचा माल जप्त #deshidaru - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लॉकडाऊन मध्ये गावठी ची वाढती डिमांड - दोन धाडीत तीन लाखाचा माल जप्त #deshidaru

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -

येथून जवळच असलेल्या नागरी परिसरातील एका शेतात गावठी दारू काढत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सतीश देशमुख यांना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागरी शेतशिवारात हातभट्टीवर मोहाची दारु काढत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी धाड टाकली असता नदीच्या काठावर निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रममध्ये गावढी हातभट्टीची ९०० लिटर दारु सडवा जप्त केला. 

त्यानंतर नागरी येथील शंकर शिवरकर यांच्या शेतात दहा प्लास्टिक ड्रममध्ये एक हजार लिटर मोहफुलाचा सडवा जप्त करून शंकर शिवरकर (३८), विजय दिवाकर नैताम,(३५) दिनेश बोरकर (३२), दिगांबर आत्राम (४५) सर्व रा. नागरी यांच्याविरुध्द दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून शोध सुरु केला आहे.