शेतकुंपणच्या तारेने विद्युत शॉक लागून मुलाचा मृत्यू : वडील गंभीर #current - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकुंपणच्या तारेने विद्युत शॉक लागून मुलाचा मृत्यू : वडील गंभीर #current

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -

तालुक्यातील रैयतवारी येथील शेतकरी सुनील फाले (25) व त्याचे वडील टमाटर च्या शेतीला पाणी पुरविण्याकरीता गेले होते. सुनील हा नेहमी प्रमाणे मोटर पंप चालू करण्याकरिता गेला असता विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील सुध्दा गंभीर जखमी झाले. जखमीला गडचिरोली येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील रयतवारी येथे विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची गंभीर घटना आज रोजी दुपारच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. सदर चौकशी व पंचनामा सहायक पोलीस निरीक्षक मस्के, बोलीवार, रूपेश व वाटे एरिया लाइनमैन यांच्या उपस्थित पुढील तपास चालू आहे