सिमेंट कंपन्यांनी सी. एस. आर.निधीअंतर्गत ग्रामीण जनतेला अन्नधान्य, मास्क व सॅनिटयझरचा पुरवठा करावा:-जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले :अंबुजा, माणिकगड,अल्ट्राटेक सिमेंट कंपन्यांना निवेदन #csrfund - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिमेंट कंपन्यांनी सी. एस. आर.निधीअंतर्गत ग्रामीण जनतेला अन्नधान्य, मास्क व सॅनिटयझरचा पुरवठा करावा:-जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले :अंबुजा, माणिकगड,अल्ट्राटेक सिमेंट कंपन्यांना निवेदन #csrfund

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज भारताच्या तुलनेत राज्याची स्थिती महाभयंकर आणि विदारक होत चालली आहे. त्यामुळे याचा फटका जिल्ह्याला बसू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपयोजना आखल्या जात आहेत.

अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण जनता या रोगाच्या प्रसारापासुन दूर रहावी. त्यांना प्राथमिक सुरक्षा व उपचार प्राप्त मिळावा या दृष्टीने जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांनी आपल्या CSR फंडातून परिसरातील ग्रामीण जनतेला अन्नधान्य, मास्क व हँड सॅनिटयझरचा पुरवठा करावा असे निवदेन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी कोरपना तालुक्यातील अंबुजा,माणिकगड, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य प्रबंधकांना दिले.
      
ग्रामिण भागातील अनेक नागरिकांकडे अद्यापही रेशन कार्ड नसल्यामुळे अन्नधान्याचा व इतर साहित्याच्या पुरवठा  शासनाकडून होत नाही आहे,तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क व सॅनीटायझर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 


तसेच सिमेंट कंपन्यांनी आपली सामजिक दायित्व दाखवत अनेक गरजू लोकांना मदत केली आहे,स्थानिक नागरिकांना अन्नधान वाटप असेल किंवा मास्क,सॅनिटायझर सुद्धा वाटप केल्याची माहिती सिमेंट कंपन्यांच्या मुख्य प्रबंधकांनी दिली तसेच जिल्हा परिषदला सुद्धा आम्ही सहकार्य करू असे आश्वासन यावेळी दिले.यावेळी त्यांसमवेत भाजयुमोचे जिल्हा सचिव आशिष ताजने उपस्थित होते.