बिग ब्रेकिंग - ब्रेकिंग : धक्कादायक : कोरोना पॉसिटीव्ह निघाला रहमत नगर मधील तो मृत : खाजगी लॅब मध्ये अहवाल पॉसिटीव्ह : डॉ. नगराळे हॉस्पिटल सिल -मृतकाचे कुटुंब कोरेन्टाईन : परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात -नागरिकांनी घाबरू नका -घरातच रहा -काळजी घ्या #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग - ब्रेकिंग : धक्कादायक : कोरोना पॉसिटीव्ह निघाला रहमत नगर मधील तो मृत : खाजगी लॅब मध्ये अहवाल पॉसिटीव्ह : डॉ. नगराळे हॉस्पिटल सिल -मृतकाचे कुटुंब कोरेन्टाईन : परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात -नागरिकांनी घाबरू नका -घरातच रहा -काळजी घ्या #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

न्यूमोनिया ने मृत पावलेल्या चंद्रपूर शहरातील रहमत नगर मधील त्या व्यक्तीचा अहवाल खाजगी लॅब मध्ये पोजीटीव्ह निघाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.


मृत व्यक्ती हा सलग 5 दिवस चंद्रपूर शहरातील  डॉ. नगराळे या खाजगी दवाखाण्यात उपचार घेत होता, ते हॉस्पिटल सील करून डॉ व त्यांचे कुटुंब कोरेन्टाईन करण्यात आले आहे.

पुढील उपचारासाठी त्या रुग्णाला नागपूर येथे हलविण्यात आले असता त्याचा काही वेळातच मृत्यू झाला होता, त्या व्यक्तीचा मृत्यू हा न्यूमोनिया ने झाला असल्याचे नागपूर मेयो रुग्णालयातील अहवालात स्पष्ट झाले त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

नागपुरात ज्या खाजगी रुग्णालयात तो रुग्ण दाखल होता तेव्हा सदर डॉक्टरांनी त्यांचे थ्रोट स्वब नमुने मुंबईला पाठविले नंतर तो अहवाल हा कोरोना पॉसिटीव्ह आला आहे.

अहवाल आल्यानंतर त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आता चंद्रपुरातील खाजगी हास्पिटल वर सुद्धा कारवाई होणार कारण 5 दिवस तो रुग्ण दाखल होता त्यावेळी कोरोनाचे लक्षण त्या रुग्णात आढळल्यावर सुद्धा त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली नाही.यापूर्वी सुद्धा डॉ नगराळे यांनी माहिती लपविल्याच्या कारणावरून मनपा च्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिकृत अहवाल येतपर्यंत कोनतिहि अफवा उडवू नका अशी सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.