मुंबईहून भद्रावतीत आले दोन दाम्पत्य : भद्रावती शहरात खळबळ उडाली : पोलीस व वैद्यकीय चमूने घर गाठून केले ‘होम क्कॉरेन्टाईन’ #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुंबईहून भद्रावतीत आले दोन दाम्पत्य : भद्रावती शहरात खळबळ उडाली : पोलीस व वैद्यकीय चमूने घर गाठून केले ‘होम क्कॉरेन्टाईन’ #covid-19

Share This

देशभरात संचारबंदी व लॉकडाऊन असताना मुंबई येथून दोन दाम्पत्य व त्यांची एक मुलगी असे पाच जण चारचाकी वाहनाने भद्रावती शहरातील संताजी नगरात दाखल झाले आहेत. त्यामुळे भद्रावती शहरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच तालुका प्रशासन त्या दाम्पत्यांच्या घरी पोहचले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना ‘होम क्कॉरेन्टाईन’ ठेवण्यात आले आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर :भद्रावती -

भद्रावती शहरातील संताजी नगर निवासी स्थानिक आयुध निर्माणीमध्ये खाजगी कंत्राटदार असून, त्यांच्या कुटुंबातील काही जण मुंबई येथे राहत होते. संचारबंदीच्या काळात ते मुंबई येथून भद्रावती येथे आलेच कसे, असा सवाल भद्रावतीकरांनी उपस्थित केला आहे. 

याबाबतची माहिती होताच वार्डवासियांनी तालुका प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस चमु, वैद्यकीय अधिकार्‍यांची चमुने त्या दाम्पत्याचे घर गाठले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. मात्र, त्यांना ‘होम क्कॉरेन्टाईन’ मध्ये ठेवल्याची माहिती भद्रावती ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. कन्नाके यांनी दिली.


त्यांच्य चारचाकी वाहनावर प्रेस लिहिले होते. शिवाय त्यांच्याजवळ एका दैनिक वृत्तपत्राचे ओळखपत्रही आढळून आले. पत्रकार असल्याचे सांगून ते इथपर्यंत पोहचले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हास्तरीय अधिकार्‍यांना दिली असून, त्यांना संस्थात्मक क्कॉरेन्टाईनमध्ये ठेववण्याचा विचार सुरू असल्याची माहिती तहसिलदार महेश शितोडे यांनी दिली.