सावली तील रस्तेच अनावश्यक फिरनाऱ्यांना बघा काय विचारताहेत ??? नगर पंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम #Covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सावली तील रस्तेच अनावश्यक फिरनाऱ्यांना बघा काय विचारताहेत ??? नगर पंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम #Covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर  -सावली : 


अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब आणि शहराला धोक्यात आणत आहात, असा सल्ला विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना सावली नगर पंचायतीने दिला. 


शहरातील म. फुले चौक, बाजार चौक येथील रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावली नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.


सावली नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेवर भर देत सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणचा परिसर, मुख्य रस्ते, शासकीय कार्यालय परिसराचे फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान बँकेसमोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी चौकोन आखून दिशा देण्याचा प्रयत्न केला.

वारंवार आवाहन करूनही सुरक्षित अंतर ठेवण्यात आणि गर्दी कमी करण्यात नागरिक पुढाकार घेत नसल्याने रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात २९ मार्चपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा दिली असून त्यांना पास देण्यात येत आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. त्याच्या अमंलबजावणीसाठी सावली नगर पंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. आता जनजागृतीची उपाययोजना म्हणून रस्त्यावर घोषवाक्य लिहिण्यात आले आहेत - मनीषा वजाळे, मुख्याधिकारी नगर पंचायत, सावली