विनापरवानगी आमदाराच्या घरासमोर तौबा गर्दी : औचित्य वाढदिवसाच्या निमित्याने धान्य वाटप : अखेर गुन्हा दाखल - पक्षांतर्गतही कार्यवाहीचे संकेत #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विनापरवानगी आमदाराच्या घरासमोर तौबा गर्दी : औचित्य वाढदिवसाच्या निमित्याने धान्य वाटप : अखेर गुन्हा दाखल - पक्षांतर्गतही कार्यवाहीचे संकेत #COVID-19

Share This
पंतप्रधान नरेंद्र मोदी  तसेच  राज्य सरकार  शासकीय अधिकारी या सर्व स्तरावरून राज्यात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत असताना येथील  भाजपचे आमदार  यांच्या घरासमोर  तेराशे चौदाशे लोकांची गर्दी जमल्याने जमावबंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिस प्रशासनात खडबड उडाली. 

खबरकट्टा / वर्धा - आर्वी ( उमंग शुक्ला -जिल्हा प्रतिनिधी )


सविस्तर वृत्ता नुसार वर्धा -आर्वी  येथील आमदार दादाराव केचे यांनी काल दिनांक 5 एप्रिल ला  आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने उसळलेल्या गर्दीमुळे जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. 

केचे यांनी रविवार 5 एप्रिल ला  आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन शासन-प्रशासनाकडून करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे. हा उपक्रम त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत.प्रकरणात 

वाढदिवसानिमित्ताने गोरगरिबांना धान्य वाटप करण्याचे आमदार केचे यांनी जाहीर केले होते. त्यासाठी शनिवारी वॉडावॉर्डांत सायकल रिक्षाद्वारे दवंडी देण्यात आली होती. ही माहिती असल्याने केचे यांच्या निवासस्थानापुढे रविवारी सकाळपासूनच रांगा लागणे सुरू झाले. गहू, तांदूळ व अन्य किराणा स्वरूपात पिशव्या तयार होत्या. मात्र, गोरगरिबांची गर्दी वाढतच चालल्याने शेवटी एका सुज्ञ व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगविली. धान्यवाटप तत्काळ बंद करण्यात आले. केचे यांचे निवासस्थान ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. दरम्यान, काही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र ही घटना जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे. यासंदर्भात आमदार केचे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

राज्यात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे.आर्वी पोलिसांनी या गंभीर प्रकारची दखल घेत भादविं 188, 269, 280, 52/53, साथ प्रबंधक कायदा/ महा कोविड -19 उपाय योजना  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात आर्वी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक म्हणाले, "या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी प्रशासनाकडून घेण्यात आली नव्हती. या संदर्भातील चौकशी अहवाल तयार करुन पुढील कारवाईचा विचार केला जाईल." यांनी माहिती दिली आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी खासदार रामदास तडस यांचा वाढदिवस साजरा झाला होता. परंतू त्यांनी खबरदारी घेत गरजूंना घरोघरी जावून धान्यवाटप केले होते. खासदारांचे उदाहरण आमदारांनी डोळ्यापुढे ठेवले असते तर कायद्याचे उल्लंघन झाले नसते, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरु आहे.