सभापती यांनी कॉन्फरन्स कॉलिंग मार्फत सरपांचाशी साधला संवाद : विविध मुद्यावर झाली चर्चापंचायत समिती च्या सभापती यांचा पाणी टंचाई दूर करण्यासाठी अभिनव उपक्रम #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सभापती यांनी कॉन्फरन्स कॉलिंग मार्फत सरपांचाशी साधला संवाद : विविध मुद्यावर झाली चर्चापंचायत समिती च्या सभापती यांचा पाणी टंचाई दूर करण्यासाठी अभिनव उपक्रम #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखणे अत्यावश्यक आहे याचीच जाणीव ठेवून सभापती सौ. मुमताज जावेद यांनी राजुरा पंचायत समिती अंतर्गत सर्व 65 ग्रामपंचायत च्या सरपंच व सचिव यांचेशी कॉन्फरन्स कॉलिंग द्वारे सम्पर्क साधून तालुक्यातील पाणी टंचाई, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण स्वच्छता व इतर अडचणी आज दिनांक 29.4.2020  ला जाणून घेतल्या. या कॉन्फरन्स साठी गट विकास अधिकारी डॉ रामावत, विस्तार अधिकारी अमित महाजनवार,कुरसुंगे,उप अभियंता कोटनाके व सुमित रत्नाकर उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामपंचायत  च्या सर्व अडचणी दूर करण्याच्या सूचना अधिकारी यांना सभापती सौ.मुमताज जावेद यांनी दिल्या व पंचायत समिती च्या सर्व अधिकारी व्यवस्थित आपले कार्य पार पाडत असल्या बाबत समाधान व्यक्त केले.