नागपुरातून आलेल्या मूल मधील युवकाचा मृत्यू : कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह :अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला योग्य कार्यवाहीस सहकार्य करावे #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नागपुरातून आलेल्या मूल मधील युवकाचा मृत्यू : कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह :अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला योग्य कार्यवाहीस सहकार्य करावे #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

मूल येथील वार्ड नागोशे मोहल्ला येथील अतुल वासुदेवराव गावतुरे,(वय अंदाजे 35) याचे काल रात्री चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालय येथे निधन झाले. त्याचा मृत्यू वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्कर्षानुसार संशयास्पद आहे.

मृतक अतुल गावतुरे याचा मृत्यु सध्याच्या परिस्थितीत संशयास्पद असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी कळविले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने रविवार आणि सोमवार रोजी मूल शहरात लाँक डाऊन कडक करण्यात आले होते. 

अतुल याचा  मृत्यू प्रशासनाला संशयास्पद वाटत असला तरी मृतकाच्या घरालगतच्या मंडळीना माञ त्याचा मृत्यू संशयास्पद नसल्याची खात्री होती. तरीसुद्धा प्रशासनाने मृतकाचे पार्थीव चंद्रपूर येथील शित शवागारात ठेवल्याने शहरात काहीसे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते

दरम्यान सदर मृतकाचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असुन तो निगेटिव्ह आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू अन्य आजारामूळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने परीसरातील दहशत कमी झाली आहे.
त्यामुळे शहर वासियांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला योग्य कार्यवाही करण्यास सहकार्य करावे. अशी विनंती करण्यात आली आहे. मूल येथील (नागोशे मोहल्ला) येथील मृतक अतुल वासुदेवराव गावतुरे,(35) यांच्या मृत्यूमूळे परीसरात दहशत पसरली होती.

नागरीकांमध्ये अतुलचा मृत्यू विषयी वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात होत्या. म्हणुन प्रशासनाने मृतक अतुल गावतुरे याच्या रक्ताचे नमुने कोरोना संदर्भातील तपासणीसाठी नागपुर येथे पाठविण्यात आले होते. मृतक अतुल गावतुरे यांच्या रक्ताचा नमुण्याचा तपासणी अहवाल प्रशासनास नुकताच प्राप्त झाला असुन तो निगेटिव्ह आहे, मृतक अतुल गावतुरे हा कोरोनाचा संसर्ग झाल्यामूळे नव्हे तर वेगळ्या आजारामुळे मृत्यू पावल्याचा अहवाल तज्ञानी दिला आहे. 

त्यामूळे नागरीकांनी घाबरून किंवा दहशती मध्ये न वावरता प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे.,अशी विनंती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार डि.जी. जाधव, वैद्यकीय अधिक्षक डाँ. सुर्यकांत बाबर, संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक आणि ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी केली आहे.