महाराष्ट्रात सर्वात जास्ती कोरोनाचे रुग्ण आहेत याला राज्यसरकार जबाबदार आहे अशी धारणा असणाऱ्या माझ्या मित्रांसाठी खास विश्लेषण...!!#Covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्रात सर्वात जास्ती कोरोनाचे रुग्ण आहेत याला राज्यसरकार जबाबदार आहे अशी धारणा असणाऱ्या माझ्या मित्रांसाठी खास विश्लेषण...!!#Covid-19

Share This

खबरकट्टा / विशेष-(© अभिजित पाटील फाळके )

महाराष्ट्रात सर्वात जास्ती कोरोनाचे रुग्ण आहेत याला राज्यसरकार जबाबदार आहे अशी धारणा असणाऱ्या माझ्या मित्रांसाठी खास विश्लेषण...

१. भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. जगातून भारतात येणारे ४५% अंतरराष्ट्रीय विमान पुणे मुबंई येथे सर्वप्रथम येतात. म्हणजे कोरोना येण्याचा सर्वप्रथम मार्ग पुणे मुबंईच.

२. भारतातील ३२ लाख माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपैकी १६ लाख अभियंते पुणे आणि मुबंई या दोन शहरात राहतात. त्यामुळे पुणे मुबईतून आपली मुलं जगात सर्वात जास्ती प्रवास करतात ज्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा सगळ्यात मोठा धोका इथे होता. 

३.  महाराष्ट्रातील १२ करोड लोकसंख्येपैकी अंदाजे २.५ कोटी लोकं मुबंई आणि पुणे या कमी क्षेत्रफळात राहतात. लोकसंख्येच्या या घनतेमुळे कोरोना प्रादुर्भावाचा सर्वात मोठा धोका इथेच. 

४. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही मुबंईलाच आहे जिथे ८ लाख लोक राहतात. मुंबईतिल सर्व झोपडपट्टी आणि त्यात राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या मोजली तर ती अंदाजे ३२ लाखाच्या आसपास जाईल. 

५. संपूर्ण राज्याच्या नागरिकांना सामावून घेण्यात महाराष्ट्र या देशात अव्वल आहे. मुंबई, पुणे हीच शहर तुम्ही पकडली तर किमान १४ लाख लोक येथे रोजगाराच्या निमित्याने ये जा करतात. संपूर्ण स्थायिक झालेल्या लोकांचा आकडा मलाही माहिती नाही. 

अश्या राज्यामध्ये जीथे इतकी येजा आहे तिथे कोरोनाचा आकडा सर्वात जास्ती असल्यास ते स्वाभाविक आहे.

मुद्दा हा आहे की महाराष्ट्र सरकार ने आजवर कोरोनाच्या विरोधी लढाई मध्ये पावले काय उचलली? 

१. भारतात सर्वात जास्ती कोरोनाच्या टेस्ट (३३०००) महाराष्ट्रात झाल्या आहेत. 

२. केंद्र सरकारच्या दोन दिवस आधी लॉकडाउन महाराष्ट्र सरकारने लावले. 

३. या देशात सर्वात जास्ती सुविधा म्हणजे व्हेंटिलेटर, अद्यावत सरकारी हॉस्पिटल आणि शिक्षित आरोग्य कर्मचारी महाराष्ट्रात आहेत. 

४. आंतरजिल्हा वाहतूक सर्वात आधी महाराष्ट्रात बंद केल्या गेली. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात रोखला गेला. 

५. या राज्याचा मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री रोज जनतेला संबोधित करून सध्याच्या स्थितीचा संपूर्ण आढावा आणि सोबत दिलासा सुद्धा देतो. 

मला फक्त एक सांगायच आहे की कोरोनासारख्या एवढ्या मोठ्या जागतिक महामारीत महाराष्ट्राचे सरकार आणि प्रशासन  मा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिशय सक्षमपणे लढा देतोय. डोकं शांत ठेवा आणि या लढ्याचे शिपाई व्हा. 

© अभिजित पाटील फाळके 
भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, महाराष्ट्र