चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णासोबत चार जोडपे होते प्रवासाला -नमुने तपासायला 13 दिवस दिरंगाई मुळे शंकाकुशंका उपस्थित : नागपुरात कोरोना पॉसिटीव्ह चा पहिला मृत्यू : विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णासोबत चार जोडपे होते प्रवासाला -नमुने तपासायला 13 दिवस दिरंगाई मुळे शंकाकुशंका उपस्थित : नागपुरात कोरोना पॉसिटीव्ह चा पहिला मृत्यू : विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर #COVID-19

Share This

खबरकट्टा / विदर्भ : (7 मार्च 2020-7:30AM)

पॉझिटिव्ह रुग्णासोबत चार जोडपे होते प्रवासाला

चंद्रपूर येथील रहिवासी असलेला ३९ वर्षीय रुग्ण हा इण्डोनेशिया ते दिल्ली आणि तेथून विमानााने २४ मार्च रोजी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पोहचला. या रुग्णासोबत त्याची पत्नी आणि आणखी तीन जोडपे होते. या आठही प्रवशांना आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. 

यातील केवळ ३९ वर्षीय पुरुषाचे नमुनाची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु नमुना तपासायला लागलेला उशीर व आमदार निवासात १३ दिवसांचे वास्तव यामुळे अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहे.


कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा पहिल्या मृत्यूची नोंद सोमवारी नागपुरात झाली. विशेष म्हणजे, मृतकाची कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या शिवाय, चंद्रपूर एक-एक तर बुलडाण्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विदर्भात एकाच दिवशी पाच रुग्ण आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. 

नागपूर सतरंजीपुरा येथील रहिवासी असलेले ६८ वर्षीय रुग्णाला हगवण आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्री १०वाजताच्या सुमारास मेयोच्या वॉर्ड क्र. ५ मध्ये दाखल केले. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह मेयोच्या शवविच्छेदन गृहात ठेवून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सोमवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचा प्रवासाचा इतिहास नाही. तरीही पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस सतरंजीपुऱ्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. या भागात कुणाला लक्षणे दिसताच त्यांनी मेयो, मेडिकलमध्ये दाखल होण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
-----------------------------------------
ब्रेकिंग चंद्रपूर : जिल्ह्यातील एक व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह : वाचा जिल्हाधिकारी लक्षवेधी  : जिल्हा शल्यचिकित्सक यांची माहिती #COVID-19

खबरकट्टा / चंद्रपूर : (6 मार्च 2020-9PM)


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील स्थायी रहिवासी असलेला एक व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह सापडला आहे. तरीही त्याला नागपूर येथेच ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही.


थोडक्यात माहिती नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी असलेला एक व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह असून तो इंडोनेशिया येथून भारतात दिल्ली येथे परतला होता. दिल्ली वरून चंद्रपूर येथे पोहोचत असतानाच नागपूर विमातळावर लाच 22मार्च लॉकडाऊन पूर्वीच त्याला विदेश प्रवास व प्राथमिक लक्षणें असल्याने आमदार निवारा नागपूर येथे विलगीकरणात(quarantine)क्वॉरन्टीन् ठेवण्यात आले होते.

आता त्रास वाढल्याने तपासणी अंती कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहित जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली असून त्या रुग्णाचा चंद्रपूर जिल्ह्यात शिरकावच झाला नसल्याने घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे नागरिकनकाळविले आहे. 


जिल्हाधिकारी लक्षवेधी -


चंद्रपूर जिल्ह्याचा नागरिक असणारा एक व्यक्ती विदेशातून आल्यापासून नागपूरला इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन होता. तो चंद्रपूरमध्ये आलाच नाही. सदर व्यक्ती हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचा सध्या चंद्रपूरशी संबध नाही : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार