अन्न-धान्य वाटपात लोकप्रतिनिधिंची पोलखोल ...??? ◾️ चंद्रपुरात मनपा निधीतून जेवण डब्बे वाटपात घोळ तर ◾️ राजुऱ्यात खाजगी कंपन्यांकडून मिळत असलेले धान्य स्वतः साठवून ठेवण्याचा प्रकार ◾️ संकटकाळातही लोकप्रतिनिधींना फक्त मी केले या प्रसिद्धीचा हव्व्यास का..??? #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अन्न-धान्य वाटपात लोकप्रतिनिधिंची पोलखोल ...??? ◾️ चंद्रपुरात मनपा निधीतून जेवण डब्बे वाटपात घोळ तर ◾️ राजुऱ्यात खाजगी कंपन्यांकडून मिळत असलेले धान्य स्वतः साठवून ठेवण्याचा प्रकार ◾️ संकटकाळातही लोकप्रतिनिधींना फक्त मी केले या प्रसिद्धीचा हव्व्यास का..??? #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :देशात लॉकडाऊन आहे, गोरगरिबांच्या दैनंदिन रोज्या बुडालेल्या आहेत अश्या परिस्थितीत अनेकांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना काही राजकारणी मात्र त्यांना मिळणाऱ्या शासकीय, खाजगी,  सामाजिक संस्था किंवा दानशूर व्यक्तीकडून मिळणारी मदत आपण केल्याचा या गोरगरीब जनतेसमोर आव आणून श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असल्याचे सर्वत्र चित्र आहे. अरे परंतु ही प्रचाराची वेळ नसून जनतेला मिळणाऱ्या सोईसुविधांचा सर्वपरी, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याची असल्याचे यांना कोण समजाविणार... !!!

कालच चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील निराधारांना अन्न पुरविण्यासाठी महानगर पालिकेने जेवणाचे डबे पुरविण्याकरिता दिलेल्या कंत्राटदाराकडून काही लोकप्रतिनिधी कसा स्वतःचे नाव वापरून शासकीय निधीचा कसा गैरवापर करीत आहेत हे पुराव्यानिशी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी तक्रार सादर केली. 

आज असाच प्रकार राजुरा तालुक्यात उघडकीस आलाय, राजुरा विधानसभा क्षेत्रातील माणिक गड अंबुजा व एल अँड टी या सिमेंट कंपन्यांद्वारेअंदाजे प्रत्येक सिमेंट कंपनी कडून पाचशे ते हजार अन्नधान्यांच्या किट या नगरपरिषद यांना देण्यात आलेल्या आहेत. परंतु स्थानिक नगरसेवक नगराध्यक्ष आमदार यांच्या हस्तक्षेपामुळे गोरगरीब जनतेपर्यत यांचे वाटप होत नसल्याने सदर सर्व अन्नधान्य तथा या कंपन्या देऊ इच्छित असलेली मदत ही आपण आपले प्रतिनिधी पाठवून आपल्या ताब्यात घ्यावी व जनसामान्यांपर्यंत ती पोहोचविण्यात यावी अशे विनंती पत्र प्रहार च्या सुरज ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले आहे. 

काही नगरसेवक नगराध्यक्ष हे कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या किट व अन्नधान्य हे स्वतःच्या हातून वाटून जणूकाही स्वतः हे सर्व अन्नधान्य गोरगरीब करिता देत आहेत, अशा पद्धतीचा आभास निर्माण करीत आहेत.

सवाजसेवेचा हा आभास निर्माण करण्याकरिता त्यांच्यामध्ये चढाओढ लागली असल्याने अन्नधान्यांच्या किट तथा इतर सामग्री ही अजून पर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचली नाही. अशा कठीण समय देखील या लोकांना राजकारणाशिवाय दुसर काहीच सुचत नाही आहे,तरी या विषयात जिल्हाधिकाऱ्यांनी  तात्काळ हस्तक्षेप करून  संबंधित गरजुंना प्रशासनाने आपल्या हस्ते किंवा आपल्या प्रतिनिधींच्या हस्ते वाटप करणे गरजेचे झाले आहे.