डॉ. विनोद नगराळे यांच्यावर गुन्हा दाखल - कोरोना संशयित रुग्णाची लपविली माहिती - मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. खेरां यांची तक्रार #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डॉ. विनोद नगराळे यांच्यावर गुन्हा दाखल - कोरोना संशयित रुग्णाची लपविली माहिती - मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. खेरां यांची तक्रार #COVID-19

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर -1 एप्रिल 2020-

कोरोनाची दशहत सुरु असताना संपूर्ण प्रशासन संसर्ग थांबवून संपविण्यासाठी झटत असताना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला होता. 

मात्र चंद्रपुरातील सुप्रसिद्ध डॉ. विनोद नगराळे यांनी रहमत नगर येथील संशयित रुग्णाचा उपचार केला आणि परस्पर सुट्टी दिली. 

या प्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खेरा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असून देशात सुद्धा 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे सात्यत्याने आवाहन होत आहे. 

डॉ. नगराळे यांचेकडे रहमत नगर येथील रुग्ण दाखल झाला. या रुग्नावर कोरोना साधर्म्य लक्षणें होती तरीही  उपचार करून सुट्टी देण्यात आली त्यानंतर तो रुग्ण संशयीय आढळून लगेच त्याचा मृत्यू झाला.मृत्यूच्या घटने नंतर डॉ. नगराळे यांनी समंधित रुग्णांची माहिती प्रशासनाला दिली नसल्याचे समोर आले. 

चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

शहर पोलीस ठाणे हद्दीत डॉ. नगराळे यांचे एकोरी वॉर्ड येथे खाजगी रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात दाखल करून घेतलेल्या रुग्णाला कोरोना साधर्म्य लक्षणें आढळून आली असताना सुद्धा  त्यावर उपचार करण्यात आला व सुट्टी देण्यात आली त्यानंतर त्याचा मृत्यू झाला याची प्रशासनाला माहिती न दिल्याची तक्रार आमच्याकडे मनपा अधिकाऱ्याद्वारे देण्यात आल्यानंतर आपातकालीन व्यवस्थेच्या आज्ञेचे पालन न केल्यामुळे कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची अधिकृत माहिती शहर पोलीस ठाणेदार  चंद्रशेखर बहादुरे यांनी दिली आहे.