विदर्भ वृत्त : कोरोना सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू #coronavirus - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ वृत्त : कोरोना सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू #coronavirus

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : थोडक्यात -कळंब तालुक्याच्या जोडमोहा येथील अंगणवाडी सेविकेचा सर्वेक्षण करताना मृत्यू झाला. संध्या सज्जनवार असे त्यांचे नाव आहे. त्या दोन दिवसांपूर्वी आजारी पडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. 


संध्या यांचा कोरोंनाने मृत्यू झाला काय, याचा अहवाल मागविला जाणार आहे. दरम्यान आयटक संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप उटाणे यांनी अंगणवाडी सेविका कोरोनाच्या कामात व्यस्त होती, यामुळे सरकारने जाहीर केलेला 50 लाखाचा विमा कुटुंबाला द्यावा, अशी मागणी व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांच्याकडे केली आहे.