CoronaVirus केंद्राचा निर्णय काहीही असो; राज्यात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत : अंतिम निर्णय दोन दिवसांत #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

CoronaVirus केंद्राचा निर्णय काहीही असो; राज्यात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत : अंतिम निर्णय दोन दिवसांत #lockdown

Share This

खबरकट्टा / थोडक्यात -10 एप्रिल 
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आता लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असून यावर राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्याचा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठवावे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही, त्या जिल्ह्यांना लॉकडाउनमधून वगळावे, असा सूर मंत्रिमंडळाच्या आधीच्या बैठकीत व्यक्त झाला होता.

मात्र गेल्या चार दिवसांत मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच नव्याने काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन १४ एप्रिलला संपेल, अशी शक्यता संपुष्टात आली आहे. लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय उद्या म्हणजे ११ एप्रिलला होईल, अशी शक्यता आहे.

पाच तुरुंग लॉकडाउन : 
कोरोनाग्रस्त भागातील पाच तुरुंग आजपासून लॉकडाउन करण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या तुरुंगामध्ये मुंबई सेंट्रल, ठाणे, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृहाचा समावेश आहे. या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी आज आहेत ते तेथेच राहतील. त्यांच्या घरच्यांशी ते मोबाइलवर बोलू शकतील. लॉकडाउन कालावधीत या तुरुंगाचे मेन गेट उघडण्यात येणार नाही.