फेसबुक व इतर सोशल मीडिया वर परवानगी शिवाय मदतीचे फोटो टाकल्यास कार्यवाही होणार : बघा विडिओ : डॉ. कुणाल खेमणार जिल्हा धिकारी चंद्रपूर यांची जाहीर सूचना #collectorchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

फेसबुक व इतर सोशल मीडिया वर परवानगी शिवाय मदतीचे फोटो टाकल्यास कार्यवाही होणार : बघा विडिओ : डॉ. कुणाल खेमणार जिल्हा धिकारी चंद्रपूर यांची जाहीर सूचना #collectorchandrapur

Share This
खबरकट्टा / जाहीर सूचना :अनेक संस्था आणि नागरिक कोरोनाच्या या आपत्ती मध्ये आणि लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या नागरिकांना अनेक प्रकारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.मात्र हे करत असताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. आपण ज्या नागरिक संकटात किंवा अडचणीत अडकलेल्या नागरिकाला मदत करीत आहोत त्याचे फोटो फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया वर टाकणे हे निश्चीतच योग्य नाही त्यामुळे संबंधित व्यक्तीला आपण मदत करत असताना तो लाचार नाही मात्र अडचणीत आहे हे मानवतेच्या भावनेतून लक्षात घेऊन कृपया आपण सोशल मीडिया वर त्याच्या फोटोचा वापर करु नये. 

एखाद्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय त्याचे फोटो सोशल मीडिया वर फोटो टाकणे हे देखील चुकीचे आहे तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे सुद्धा फोटो टाकणे याला परवानगी नाही. त्यामुळे सोशल मीडिया चा वापर करताना याची काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारचे असे फोटो टाकू नयेत जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील याची काळजी घ्यावी अन्यथा आयटी ऍक्ट किंवा इतर संचारबंदी च्या नियमानुसार कारवाही केल्या जाऊ शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी विडिओ द्वारे जाहीर केले आहे.


फेसबुक व इतर सोशल मीडिया वर परवानगी शिवाय मदतीचे फोटो टाकल्यास कार्यवाही होणार : बघा विडिओ : डॉ. कुणाल खेमणार जिल्हा धिकारी चंद्रपूर यांची जाहीर सूचना #collectorchandrapur