वाढदिवसाच्या दिवशी कु.अन्वितीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधिला मदत #CMRELIEFFUND - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाढदिवसाच्या दिवशी कु.अन्वितीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधिला मदत #CMRELIEFFUND

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -

सद्या देश कोरोनॉग्रस्त वीषाणुच्या संकटात सापडलेला आहे.त्या दृष्टीने मदत करण्यासाठी सर्वजन प्रयत्न करित असतांनाच आपलाही यात सहभाग असावा म्हणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्याने वर्षभरात जमा झालेली मनी बैंक मधील रक्कम मुख्यमंत्री सहायता निधि ला देवून सामाजिक बांधीलकी जोपासन्याचे काम चीमुकल्या कु. अन्वितिने केले आहे.

वर्षभरात आपल्या मनी बैंक मधे जमा झालेली रक्कम दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्याने काढून नवीन वस्तु खरेदी  करणारी चंद्रपुर जिल्ह्यातील सावली येथील  कु.अन्विति सूरज बोम्मावार हिने यावर्षी मात्र कोणतीही वस्तु खरेदी न करता तिच्या मणि बैंक मधे जमा झालेले 2320 रुपये कु.अन्वितिने आज  23 ला तीच्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री सहायता निधित जमा केले आहे. 

सावली येथील तहसील कार्यलायात जावून तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्या मार्फत पाठवीले. कु.अन्विती या  चिमुकलीच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.