म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी मानले गडकरींचे लाख लाख आभार #CMLIVE - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी मानले गडकरींचे लाख लाख आभार #CMLIVE

Share This
मुख्यमंत्री लाईव्ह : मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याला संबोधित करताना #CMLIVE

खबरकट्टा / मुख्यमंत्री लाईव्ह : 26 एप्रिल 2020- 

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र सरकारची भूमिका, तयारी, नागरिकांनी घ्यायची खबरदारी यावर मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याला संबोधित करताना बघा लाईव्ह.

आज रविवारी दुपारी 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी, सर्वप्रथम अक्षय तृतीया, रमजान आणि महात्मा  बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वांनी आपले सण-उत्सव घरात साजरे करुन मानवतेचा धर्म जपला, याबद्दल सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले. 

देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, तो देव यांच्या माध्यमातून आपलं काम करत आहेत. माणसांत देव आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. 

त्यानंतर, राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

मी राजकारण बाजूला ठेऊन या लढाईत लढतो आहे. मात्र, काही जणांकडून राजकारण केलं जात आहे. मी या फंद्यात पडत नाही, सध्या कोरोनाच्या लढाईत लढायचं हे माझं प्राधान्यानं काम आहे. पण, मला अनेकांकडून तसं सांगण्यात येतंय. जर, तसं घडत असेल तर मला आवर्जून केंद्रीयमंत्री यांचं आभार मानायचं आहे. 

नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद.. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण करणाऱ्या काहींना नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिलाय. ही वेळ राजकारण करायची नाही, हे नितीनजींनी सांगितलंय. त्यामुळे मला त्यांचे आभार मानावे वाटतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना सल्ला दिला होता. कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये, असे गडकरी यांनी म्हटले होते.