आम्ही केली - तुम्हीही करा : CM Relief Fund - (मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी )ला साहाय्य करा - कु. गोमती पाचभाई : कसे आणि कोणत्या खात्यात कराल वाचा सविस्तर.. !! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आम्ही केली - तुम्हीही करा : CM Relief Fund - (मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी )ला साहाय्य करा - कु. गोमती पाचभाई : कसे आणि कोणत्या खात्यात कराल वाचा सविस्तर.. !!

Share This

 • आम्ही केले - तुम्हीही करा..... !!!
संपूर्ण जगात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या महामारी संक्रमणाचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता देशात लॉकडाऊन असल्याने आपल्या राज्यातील अनेक निराधारांना आधार तर अर्थव्यवस्थेचा फेरा अडकून पडल्याने राज्यात अनेक सोयीसुविधांकरिता राज्य सरकार ला प्रत्येकाने नागरिक जाणिवेतून शक्य तितकी मदत आपण करूयात......आम्ही केली...... आपणही नक्की करा.....!!! - कु. गोमती पाचभाई, (www.Khabarkatta.com)


खबरकट्टा / चंद्रपूर :जाहीर आवाहन -

कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे.


'उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19

खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

दरम्यान लॉक डाऊनच्या काळात मदतीचं मोठं जाळं उभं करण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने लॉक डाऊनमुळे बाधित गोर गरीब, मजूर, ज्येष्ठ नागरिक, गरजूंना अन्न-धान्याचा पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.  दिवसाला किमान 20 ते 22 लाख लोकांपर्यंत मदत पोहचण्याचा राज्यातील नेत्यांचा निर्धार आहे.