गडचांदूर पोलिसांना मारहाण प्रकरण : सर्व आरोपींना अटक -विडिओ बघा : पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांची माहिती : अनुचित घटनेचा निषेध व आरोपीस कडक कार्यवाही करिता अँड.संजय धोटे यांचे शासनाला पत्र #chandrapur police - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर पोलिसांना मारहाण प्रकरण : सर्व आरोपींना अटक -विडिओ बघा : पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांची माहिती : अनुचित घटनेचा निषेध व आरोपीस कडक कार्यवाही करिता अँड.संजय धोटे यांचे शासनाला पत्र #chandrapur police

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -
संपूर्ण देशात लॉकडाऊन असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील संचारबंदी असताना गडचांदूर शहरातील सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले असता क्रिकेट खेळणाऱ्या एका शासकीय नोकरीत असणाऱ्या इंजिनिअर व त्याच्या परिवाराने पोलिसांवर बॅट व स्टम्प ने हमला केला असता एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची धक्कादायक घटना काल  दुपारी घडली आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी अधिकृत माहिती खबरकट्टा  ला दिली असून सविस्तर माहिती नुसार आज दिनांक 19 एप्रिल दुपारी 12 वाजताच्या दरम्यान गडचांदूर पोलीस कॉन्स्टेबल तिरुपती माने व रोहित चिडगिरे शहरात गस्तीवर असताना सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर काही युवक क्रिकेट खेळताना आढळले. पोलिसांनी यांना संचारबंदी असून क्रिकेट खेळण्यास मनाई करत घरी जाण्यास सांगितले असता खेळत असलेला इंजिनिअर अविनाश चव्हाण अचानक पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ करायला लागला.


गंभीर जखमी तिरुपती माने यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दाखल केले असता त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले व रोहित चिडगिरे यांना सुद्धा प्रथमोपचार करून चंद्रपूर ला हलविण्यात आले.

सामील व्हा : खबरकट्टा च्या Whats App ग्रुप मध्ये 

अनुचित घटनेचे  समर्थन मी  करणार नाही  व हल्ला करण्यावर कार्यवाही  झालीच पाहिजे असे पत्र राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार  मा.आमदार अँड.संजय धोटे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीवर उचित कार्यवाही करण्यास निवेदन दिले आहे.
                

राजूरा येथील जलसंधारण उप विभागात कार्यरत असलेले  अभियंता अविनाश चव्हाण व ईतर यांनी तिरुपती माने व रोहित चिडगीरे या पोलिस कर्मचाऱ्यांना माराहाण करण्यात  आली. सदर हि घटना निषेधार्ह असून अशा प्रकारे शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण  करणे शोभनीय  नाही.व आता देशात सुरु असलेल्या संकटकाळात 24 तास  कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारीना मारहाण करणे हि बाब निंदनीय ,शोकास्पद  आहे म्हणून मी गडचांदूर येथे घडलेल्या प्रकरणात श्री.अविनाश चव्हाण अभियंता जलसंधारण विभाग राजुरा व ईतर  याच्या विरोध कडक कार्यवाही करण्याची मागणी शासनाकडे केली आहे -मा.आमदार अँड.संजय धोटे