चंद्रपूर बिग ब्रेकिंग : चंद्रपूरच्या करोनामुक्त दांपत्याला मेडिकलमधून सुट्टी : डॉक्टर,आरोग्यसेविकाणी टाळ्या वाजवून दिला निरोप मेडिकलच्या आरोग्य सेवेबद्दल मानले आभार सर्वांनी डॉक्टरांना मदतीचे आवाहन १४ दिवस पुन्हा नागपुरमध्येच विलगीकरण कक्षात ठेवणार #chandrapur corona positive couple recoverd from covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर बिग ब्रेकिंग : चंद्रपूरच्या करोनामुक्त दांपत्याला मेडिकलमधून सुट्टी : डॉक्टर,आरोग्यसेविकाणी टाळ्या वाजवून दिला निरोप मेडिकलच्या आरोग्य सेवेबद्दल मानले आभार सर्वांनी डॉक्टरांना मदतीचे आवाहन १४ दिवस पुन्हा नागपुरमध्येच विलगीकरण कक्षात ठेवणार #chandrapur corona positive couple recoverd from covid-19

Share This
खबरकट्टा / नागपूर :


मूळ चंद्रपूरच्या व विदेशातून नागपुरात परतलेल्या दांपत्याला करोना झाल्यावर दोघांवर शासकीय वैधकीय महाविधालय व   रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले.  दोघेही करोनामुक्त झाल्याचा अहवाल येताच आज त्यांना  सुट्टी देण्यात आली. परंतु दोघांनाही खबरदारी म्हणून पुढचे 14 दिवस नागपूर येथेच विलगीकरणात ठेवले जाणार आहे.
कोरोना मुक्त झाल्यामुळे आज दोघांना मेडिकल मधून सुटी झाल्यानंतर डॉक्टरांनी तसेच परिचारिका, वैधकीय कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला, कोरोना मुक्तीसाठी केलेल्या उपचाराबद्दल त्यांनी डॉक्टर व कर्मचारी यांच्या बद्दल कृतद्नंत  व्यक्त केली व आभार मानले.

चंद्रपूर येथील  39 वर्षीय पती आणि 32 वर्षीय पत्नी असे दोघेही इंडोनेशीयाहून दिल्ली मार्गे नागपुरात आले होते. दोघांनाही प्रशासनाने खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवले. 6 एप्रिलला पतीला कोरनाची लागन झाल्याचे  पुढे आले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करून त्यांच्या पत्नीचीही तपासणी करण्यात आली. तिलाही  करोना असल्याचे स्पष्ट झाले. मेडिकलमध्ये यशस्वी उपचारानंतर त्यांचे नमुने  सलग दोन दिवस तपासण्यात आले. 


दोन्ही वेळा ते नकारात्मक आल्याने  बुधवारी त्यांना  सुट्टी दिली गेली. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता  डॉ साजल मिश्रा,डॉ. राजेश गोसावी, वैद्याकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, करोनाबाबतचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. कंचन वानखेडे, डॉ. मुखी, मेट्रन मालती डोंगरेसह येथील  कर्मचाºयांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. त्यांनीही डॉक्टरांचे आभार मानले. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या रहाण्यासह उपचाराच्या सुविधेवरही त्यांनी समाधान व्यक्त केले.