अबब ! रिकामटेकड्यांना बेशरमा ची फुले व झाडाचा गुलदस्ता देऊन स्वागत : चंद्रपुरात नाकाबंदी कडक :#chabdrapurpolice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अबब ! रिकामटेकड्यांना बेशरमा ची फुले व झाडाचा गुलदस्ता देऊन स्वागत : चंद्रपुरात नाकाबंदी कडक :#chabdrapurpolice

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 
देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. प्रशासनही दररोज जनतेला घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहेत. असे असताना शहरातील रस्त्यांवर दुचाकीस्वारांची गर्दी बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातील नाकाबंदी आणखी कडक केली आहे. 

चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या नागपूर मार्गावर वडगाव, मूलकडून येणाऱ्या मार्गावरील बंगाली कॅम्प या शिवाय रामनगर पोलीस ठाणे, जटपुरा गेट येथील नाक्यावर वाहनधारकांना अडवून विनाकामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र यात काही प्रमाणात शिथिलता होती. 

मात्र नागरिकांचे बाहेर निघण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे नाके आता कडक झाले आहेत. प्रियदर्शिनी चौकालगत शहरातून येणाऱ्या मार्गावर नव्याने नाकाबंदी केली आहे.रिकामटेकड्यांना बेशरम झाडाचा गुलदस्ता :

लॉकडाऊन असताना विनाकारण दुचाकीने फिरणाºया रिकामटेकड्या युवकांना घुग्गुस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी बेशरम झाडाचे गुलदस्ते देऊन सत्कार केला. यापुढे घराबाहेर निघाल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली. संचारबंदी दरम्यान शहरातील ९ दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली.'

पासेसशिवाय दुचाकी बाहेर काढल्यास कडक कारवाई :
जिल्हा प्रशासनाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्या बाहेर पडायला लागल्यामुळे नागरिकांना आता दुचाकी गाडी चालविण्यासाठी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनाच फक्त संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून पासेसवर परवानगी मिळत आहे.  त्यामुळे घराबाहेर दुचाकी घेऊन निघाल्यास कारवाई होणार आहे.