शेतर्‍यांकडील सर्व कापुस खरेदी न केल्यास शेतकरी संघटनेचे आंदोलन_अनिल घनवट#CCICOTTON - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतर्‍यांकडील सर्व कापुस खरेदी न केल्यास शेतकरी संघटनेचे आंदोलन_अनिल घनवट#CCICOTTON

Share This
खबरकट्टा / वर्धा  :शेती विषयक -


कापुस उत्पादक शेतकर्‍यांची समस्या लक्षात घेउन शासनाने सर्व प्रतिचा सर्व  कापुस खरेदी न केल्या शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

        
लॉकडाउनमुळे  २० मार्च पासुन बंद असलेली कापुस खरेदी शासनाने पुन्हा सुरु केली आहे मात्र फक्त एफएक्यू प्रतीचाच कापुस खरेदी करावा व रोज एका केंद्रावर विस गाड्याच स्विकारण्याचे आदेश सिसिआयला दिले असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांंकडे शिल्लक असलेला बहुतेक कापुस एफएक्यू प्रतीत न बसणारा आहे. हा नॉन एफएक्यू कापुस कुठे विकायचा हा शेतकर्यांपुढे प्रश्न आहे. कापुस गाठी विकणे शक्य नाही, खरेदीसाठी पैसे नाही, सिसिआय व शासना दरम्यान झालेल्या जिनिंगच्या करारात वाद निर्माण झाल्यामुळे व्यापारी किंवा जिन मालक कापुस खरेदी करण्यास तयार नाहीत. शेतकर्‍यांच्या कापसाला आज खरेदीदारच नाही.
           
तिव्र उष्णतेमुळे घरात कापुस ठेवणे कठीण झाले आहे. कपाशीला होणार्या किडीमुळे घरात राहणे व झोपणे अशक्य झाले आहे. शेतकर्यांना कापुस विकायचा आहे परंतू खरेदी अद्याप सुरु नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
      
शासनाने फक्त एफएक्यू ग्रेडचा कापुस खरेदी न करता आणखी दोन ग्रेड मध्ये कापुस खरेदी केल्यास शेतकर्‍यांकडील सर्व कापुस खरदी होऊ शकतो. रोज विस गाड्या एवजी गर्दी न करता जितक्या जास्त गाड्या स्विकारता येतील तितक्या स्विकाराव्यात. सर्व जिन प्रेसवर कापुस खरेदी करण्यात यावी. गरज भासल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करुन शासनाने जिन ताब्यात घेउन सर्व कापसाचे जिनिंग करुन गाठी बनवाव्यात.

तसेच शेतकर्‍यांनी खाजगी व्यापार्‍यास कापुस विकल्यास त्याला "भावांतर योजने" अंतर्गत किमतीच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. असे पर्याय शेतकरी संघटनेने सुचविले आहेत. शेतकर्‍यांची अडचण व पुढे येणार्‍या पावसाळ्याचा विचार करता शासने तातडीने निर्णय घण्याची अवश्यकता आहे.

      
राज्य शासनाने त्वरित निर्णय जाहीर करुन दि. २९ एप्रील पर्यंत अंमलबजावणी सुरु न केल्यास शेतकरी संघटेला नाइलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. लॉकडाउनचे सर्व नियम पाळुन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी, मुख्यमंत्र्याला पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे असे अनिल घनवट अध्यक्ष, शेतकरी संघटना यांनी कळविले आहे.