शेतकरी ब्रेकिंग : आजपासून सि.सी.आय चे कापुस खरेदी सुरु ! #ccicotton - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी ब्रेकिंग : आजपासून सि.सी.आय चे कापुस खरेदी सुरु ! #ccicotton

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 20एप्रिल 2020-


यंदा राज्यात कापसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे झालं आहे. त्यानुसार भारतीय कापूस निगम महामंडळ (सीसीआय) मार्फत आणि कापूस फेडरेशनच्या वतीनं राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यानं शेतकऱ्यांना त्याठिकाणी आपला माल घेऊन जाता येत नाही आणि तसं करणं योग्यही नाही. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरीही शेतीपूरक व्यवसायांना त्यातून मुभा देण्याची राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे.

औषधाची दुकानं, औषध उत्पादन करणारे कारखाने यांनाही सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर साधारण येत्या 20 एप्रिलपासून राज्यात पुन्हा कापूसखरेदी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याची माहिती पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कापूस खरेदीबाबत शनिवारी  मुंबईत बैठक झाली व  संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना त आल्या आहेत की, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमधील विविध जिल्ह्यांत कापूस खरेदी सुरू करावी. ही खरेदी सुरू होत असताना शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कापूस केंद्रावर आणावा. त्यासाठी त्यांनी नियोजन करावे. 


या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर कडून जिल्ह्यात 20 एप्रिल पासून सि.सी.आय चे कापुस खरेदी सुरु करण्याचे आदेश निघाले असून कोरोना प्रादुर्भाव व संचारबंदी ची खबरदारी घेण्याकरिता काही अटींचे पालन खरेदी केंद्रांना सूचित केले आहे.

बाजार समिती चंद्रपुर अंतर्गत सोसायटी 3 प्रोसेसर्स प्राय लि. धानोरा, ता-चंद्रपूर येथे सि, सि. आय. ची कापूस खरेदी लवकरच सुरू होणार आहे. करिता कापुस नोंदणी दिनांक 20/04/2020 पासुन सुरू होत आहे. तरी शेतकरी बांधवांनी बाजार समितीने ठरवुन दिलेल्या अटी/शर्ती चे  पालन करावे व बाजार समिती चंद्रपुर मध्ये आपले नाव नोंद करावे.

◾️ सि.सी.आय चे कापुस खरेदी केंद्रावर फक्त Fair Average Quality (F.A.Q.) दर्जाता कापुस खरेदी करण्यात येईल, याची शेतक-यांनी नोंद घ्यावी. 
◾️ F.A.Q. दर्जाचा कापुस जसल्यास शेतक-यांची गाडी परत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
◾️शेतक-यांने यापु्वी सि.सी.आय. मध्ये कापुस विक्री केला असेल, तर ते कळविणे बंधकारक आहे पुळे ऑनलाईन मध्ये तसे आळळुण आल्यास वा त्यामुळे पेंट होण्यास विलंब झाल्यास बाजार समिती जबाबदार राहणार नाही.
◾️कापुस शेतमाल विक्री करीता आजण्यापुर्वी आपले नावावे नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾️कापुस शेतमालाची नोंदणी करणेकरिता आधारकार्ड पासबुक, आणि सातबारा (सातबा-यावर कापसाची नोंद असणे आसश्यक आहे.) इ. आवश्यक आहे.
◾️नोंदणी केल्याशिवाय आपला शेतमाल  स्विकारल्या जाणार नाही.
◾️नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवानी बाजार समितीने ठरवुन दिलेल्या तारखेलाच शेतमाल विकी करिता आणावा. 


धानोरा केंद्रात शेतमाल विक्रीच्या नोंदी  करीता श्री. बापुजी कन्नाके  9822367158 व  रजनीकांत येल्लुरे 7776083288 या क्रमांकवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी पत्राद्वारे कळविले असून चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही तालुके कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रवती येथे सुद्धा सर्व उपाययोजना पूर्ण करत लवकरच खरेदी सुरु होईल.