मंत्र्यांचे फोन डाउन आंदोलन आजपासून.-अनिल घनवट #Cci - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मंत्र्यांचे फोन डाउन आंदोलन आजपासून.-अनिल घनवट #Cci

Share This
खबरकट्टा /वर्धा /नितीन सेलकर-

शेतकर्‍यांकडील सर्व प्रतीचा सर्व कापुस शासनाने खरेदी करावा यासाठी शेतकरी संघटनेने केलेली मागणी पुर्णत: मान्य न केल्यामुळे ३० एप्रील पासुन मंत्री व लोकप्रतिनिधींचे फोन डाउन करण्याचे आंदोलन होणारच अशी घोषणा शेतकरी सघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली होती.
           
शेतकर्‍यांकडील कापुस खरेदी त्वरित सुरु करुन फक्त एफएक्यू प्रतीचा कापुस खरेदी न करता सर्व कापुस खरेदी करावा, त्यासाठी आणखी एक किंवा दोन ग्रेडमध्ये कापुस खरेदी करावा अशी मागणी शेतकरी संघटनेने, राज्याचे  मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांना निवेदन देउन केली होती. प्रत्येक खरेदी केंद्रावर फक्त २० गाड्या कापुस स्वकारण्याची अट रद्द करावी व व्यापार्‍यांना विकलेल्या कापसाची उर्वरीत रक्कम भावांतर योजना सुरु करुन शेतकर्‍यांना द्य‍ावी या निवेदनातील प्रमुख मागण्या होत्या. 
        
महाराष्ट्र शासनाने  रोज २० गाड्यांची मर्यादा रद्द केली असली तरी अद्याप ग्रेड वाढवणे व भावांतर योजने बाबत काही निर्णय न केल्या मुळे शेतकरी संघटनेने जाहीर केलेले कापुस कैफियत आंदोलन आज म्हणजेच  ३० एप्रील पासुन सुरु होणार आहे. कापुस हे विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाचे पिक अाहे. शासनाने शेतकर्‍यांकडील कापुस खरेदी  न केल्यास कापुस उत्पादकांवर मोठे संकट येणार आहे. सध्या तापणार्‍या ऊन्हामुळे अपघात होण्याची शक्यता आहे व महिण्याच्या आत पावसाळा सुरु होणार आहे, त्या आगोदर कापुस खरेदी पुर्ण होणे आवश्यक आहे. 
       
सिसिआय चे अधिकारी व जिन मालक एकमेकांवर टोलवाटोलवी करुन जवाबदारी टाळत आहेत. सिसिआय व जिन मालक संघटनेशी चर्चा करुन तातडीने सर्व जिन वर कापुस खरेदी सुरु करावी ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. शासनाला निवेदन देउन सुद्धा वेळेत निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी संघटनेला आंदोलनाचा आज पवित्रा घ्यावा लागला आहे.
आंदोलन कसे होइल -

आज दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजे पासुन शेतकरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्र्या सहीत सर्व मंत्री, खासदार, आमदार या लोक प्रतिनिधींना फोन करुन, एसएमएस संदेश, वॉटस्अॅप संदेश पाठवुन आपली कैफियत मांडतील. शेतकरी संघटनेच्या मागण्याचा विचार करण्याची विनंती करणार आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहील. 
     

कोरोनाचे संकट असताना रस्त्यावरचे आंदोलन शक्य नसल्यामुळे शेतकर्‍यांनी आप आपल्या घरी बसुनच हे आंदोलन करायचे आहे. संघटनेचा पुढील आदेश येई पर्यंत आंदोलन सुरु राहील. शेतकर्‍यांनी सभ्य भाषेत लोक प्रतिनिधींशी संपर्क साधावा.  


संघटनेच्या शिस्तीचे दर्शन घडवुन द्यावे अशी अपेक्षा, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट,सचिन डाफे
विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडी यांनी प्रसुद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.